IMPIMP

Nawab Malik | ईडी कोठडीत असलेल्या नवाब मलिकांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी जेजे रुग्णालयात दाखल

by nagesh
Nawab Malik | NCP leader maharashtra minister nawab malik admitted to jj hospital mumbai he was in ed custody till 3 march

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनराज्याचे अल्पसंख्याक मंत्री (Maharashtra Minister) नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीने आठ तास चौकशी केल्यानंतर अटक (Arrest) केली. न्यायालयाने नवाब मलिक (Nawab Malik) यांना 3 मार्च पर्यंत ईडी कस्टडी (ED Custody) सुनावली आहे. ईडीच्या कस्टडीत असताना नवाब मलिक यांची प्रकृती बिघडली असून त्यांना उपचारासाठी मुंबईतील जे जे हॉस्पिटलमध्ये दाखल (Admitted J J Hospital in Mumbai) करण्यात आले आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सुरुवातीला नवाब मलिक यांना वैद्यकीय चाचणीसाठी (Medical Testing) रुग्णालयात आणले आहे. मात्र, त्यानंतर समोर आलेल्या माहितीनुसार, नवाब मलिक यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नवाब मलिक यांना पोटदुखीचा त्रास (Abdominal Pain) जाणवत असल्याने त्यांना उपचारासाठी मुंबईतील जे जे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात (Money Laundering Case) राष्ट्रवादीचे नेते (NCP Leader) आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) हे सध्या ईडीच्या कस्टडीत आहेत.

मलिकांच्या 3 मागण्या कोर्टाकडून मान्य
ईडीच्या कोठडीत असलेल्या नवाब मलिक यांनी मुंबई सत्र न्यायालयासमोर (Mumbai Sessions Court) तीन मागण्या (Demands) केल्या होत्या. नवाब मलिक यांच्या तिन्ही मागण्या कोर्टाने मान्य केल्या आहेत. आपल्याला घरचे जेवण आणि औषधी मिळावी अशी मागणी मलिक यांनी केली होती. ती मागणी कोर्टाने मान्य केली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

राजीनामा घेण्याचा मुख्यमंत्र्यांना अधिकार आहेत-राऊत
नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर महाविकास आघाडीमधील (Mahavikas Aghadi)
मंत्री, आमदार यांनी केंद्र सरकारवर (Central Government) निशाणा साधला आहे.
तर भाजपने (BJP) मलिक यांच्या राजीनाम्याची (Resignation) मागणी केली आहे.
राजकीय फायद्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा (Central Investigation Agency) वापर केला जात आहे.
कॅबिनेट मंत्र्याला अटक करण्यात येते आणि यानंतर स्वत:च भाजप आंदोलन करते.
त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांनाही (CM) अधिकार आहे की, कोणाचा राजीनामा स्वीकारायचा
आणि कोणाचा रिजेक्ट करायचा असे शिवसेना नेते संजय राऊत (Shiv Sena leader Sanjay Raut) यांनी सांगितले.

Web Title :- Nawab Malik | NCP leader maharashtra minister nawab malik admitted to jj hospital mumbai he was in ed custody till 3 march

हे देखील वाचा :

Health Benefits Of Salad | जर तुम्हाला वाढते वजन कंट्रोल करायचे असेल तर डाएटमध्ये समावेश करा ‘या’ 2 ‘सलाड’चा; जाणून घ्या

Malaika Arora Shirtless Look | मलाइका अरोरानं पार केला निर्लज्जपणाचा कळस, रोडवरच टी-शर्ट काढून लटकवला गळ्यात..!

BP Control Tips | हाय ब्लड प्रेशर कंट्रोल करायचे असेल तर जाणून घ्या 6 प्रभावी उपाय

Pune Crime | तुम्ही PhonePe वर पेमेंट स्वीकारता तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी; पुण्यात तिघा सराफांची फसवणूक

Related Posts