IMPIMP

Nawab Malik | ‘फडणवीस दाम्पत्यांविरुद्ध 3 वर्षापूर्वीच ईडीकडे तक्रार, पण अद्याप…’

by nagesh
Nawab Malik | NCP leader nawab malik complaint against fadnavis couple lodged with ed 3 years ago no one has been called yet

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनराष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांची काल (बुधवारी) ईडीने (ED) 8 तास चौकशी केली. चौकशीनंतर नबाव मलिक (Nawab Malik) यांना अटक (Arrest) करुन न्यायालयात (Court) हजर करण्यात आले. न्यायालयाने नवाब मलिक यांना 9 दिवसांची ईडीची कस्टडी (ED Custody) दिली. यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. आघाडी सरकारच्या (Mahavikas Aghadi Government) मंत्र्यांकडून केंद्र सरकार (Central Government) सूडाचे राजकारण करत असल्याचा आरोप केला जाता आहे. तर दुसरीकडे भाजपचे (BJP) नेते मलिक यांच्या राजीनाम्याची (Resignation) मागणी करत आहेत. मात्र मलिक यांचा राजीनामा घेणार नसल्याची भूमिका सरकारने स्पष्ट केली आहे. तसेच भाजप नेत्यांवर का कारवाई होत नाही, असा सवाल राष्ट्रावादीकडून विचारला जात आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी (MLA Amol Mitkari) यांनी ट्विट करुन फडणवीस दाम्पत्यावर (Fadnavis Couple) अद्याप कारवाई का झाली नाही, असा प्रश्न उपस्थित केला आहे.
ॲक्सिस बँक प्रकरणाची (Axis Bank Case) तक्रार ईडीकडे 3 वर्षापूर्वीच देण्यात आली होती.
मात्र, अद्यापही दोघांपैकी एकालाही ईडीने बोलावले नाही. ईडी कुणाच्या इशाऱ्यावर नाचतेय ? असा प्रश्न अमोल मिटकरी यांनी विचारला आहे.
4 सप्टेंबर 2019 म्हणजे 3 वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (Chief Minister of Maharashtra) असताना मोहनीश जबलपुरे (Mohanish Jabalpure) यांनी ॲक्सिस बँक नुकसानीचे सप्रमाण लेखाजोखा ईडीकडे सादर केला, त्याचा हा पुरवा.
या तीन वर्षात दोघांपैकी एकालाही ईडीने बोलावले नाही.
ईडी कुणाच्या इशाऱ्यावर नाचतेय ? असे ट्विट मिटकरी यांनी केले आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

मलिकांचा राजीनामा घेणार नाही
नवाब मलिक (Nawab Malik) यांना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Underworld Don Dawood Ibrahim) याच्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात (Money laundering Case) ईडीने बुधवारी चौकशीनंतर अटक केली.
विशेष न्यायालयाने 3 मार्च पर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. नवाब मलिक यांच्या पाठीशी महाविकास आघाडी भक्कमपणे उभी आहे.
मलिक यांचा मंत्रिपदाचा राजीनामा कोणत्याही परिस्थितीत घेतला जाणार नाही, असे महाविकास आघाडीच्या बैठकीत निश्चित करण्यात आले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), काँग्रेस (Congress) विधिमंडळ पक्षाचे नेते व महलूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर ही बैठक झाली.

Web Title :- Nawab Malik | NCP leader nawab malik complaint against fadnavis couple lodged with ed 3 years ago no one has been called yet

हे देखील वाचा :

Pune Crime | पत्नीला नांदविण्यासाठी आणायला गेलेल्या पतीला मेव्हण्यांनी केली बेदम मारहाण; खडकीतील अ‍ॅम्युनेशन फॅक्टरी परिसरातील घटना

Russian President Vladimir Putin | रशियाने युक्रेनवर केला लष्करी हल्ला; पुतीन यांची युद्धाची घोषणा, चार शहरावर मिसाईल हल्ले

Pune Police | पुण्यातील वजनदार पोलिस कर्मचार्‍याचं तडकाफडकी निलंबन ! अवैध धंद्येवाल्यांशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या संपर्कात असल्याचा ठपका

Related Posts