IMPIMP

Nawab Malik | नवाब मलिकांचा समीर वानखेडेंवर पुन्हा एकदा गंभीर आरोप; म्हणाले…

by nagesh
Sameer Wankhede | former ncb officer sameer wankhede got threat on twitter account

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Nawab Malik | मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणावरुन (Mumbai Cruise Drugs Case) राज्यात मोठी खळबळ उडाली. या प्रकरणावरुन अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) अटक केली होती. यानंतर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांनी (Nawab Malik) एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप केले. यानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्या. अशात नवाब मलिकांनी आणखी आरोपांचं सत्र सुरु करत अनेक गंभीर सवाल उपस्थित केले आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

नवाब मलिक (Nawab Malik) म्हणाले, सॅम डिसूझा (Sam D’Souza) याचा जबाब दिल्लीत नोंदवून घेण्यात आल्याचे कळते आहे. याप्रकरणातील इतरांचे जबाब मुंबईत नोंदवण्यात येत असताना सॅम डिसूझा याचाच जबाब दिल्लीत नोंदवण्याचे कारण काय?, सॅम हा दिल्लीत कुठे होता?, त्याने एनसीबीच्या कोणत्या अधिकाऱ्याला हवालाने पैसे पाठवले?, त्याच्यावरचा गुन्हा मागे घेण्यासाठी कोणते डील झाले?, असा सवाल उपस्थित करत, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे एनसीबीला (NCB) द्यावी लागतील, असं मलिक यांनी म्हटलं आहे.

पुढे मलिक म्हणाले, सॅम डिसूझा हा समीर वानखेडे यांच्या प्रायव्हेट आर्मीतला माणूस आहे. सर्व नायजेरियन ड्रग्ज पेडलकरकडून हा हप्तेवसुलीचे काम करतो आणि तोच आता एनसीबीच्या (NCB) अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी मैदानात उतरला आहे, असा आरोप देखील मलिक यांनी केला आहे. तर, माझी लढाई एनसीबीसोबत नाही तर खोटी प्रकरणे बनवून मुंबईत वसुलीचे रॅकेट चालवणाऱ्या समीर वानखेडे (Sameer Wankhede), व्ही. व्ही. सिंग (V. V. Singh), आशिष रंजन (Ashish Ranjan) आणि ड्रायव्हर माने (driver Mane) नावाचा चालक या चौघांविरुद्ध आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

दरम्यान, काशिफ खान (Kashif Khan) हा क्रूझवरील ड्रग्ज पार्टीचा स्पॉन्सर होता. त्याच्यावर आजतगायत कारवाई का केली नाही. त्याला अटक का करण्यात आली नाही?, असा सवाल नवाब मलिक यांनी केला आहे. काशिफ खान हा आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया आहे. तो सध्या गोव्यात आहे. तिथे रशियन माफिया कार्यरत आहेत. या सर्वांकडून वसुलीचे काम काशिफ खान करतो. वानखेडे यांच्यासाठी ही वसुली केली जाते, असं ते म्हणाले. तसेच, एनसीबीच्या मुंबई विभागीय कार्यालयाच्या अंतर्गत गोवा राज्यही येतं. येथे धाडी पडतात आणि गोव्यात धाडी का पडत नाहीत?, असं मलिक म्हणाले.

Web Title : Nawab Malik | ncp minister nawab malik targets ncb officer sameer wankhede over cruise drugs case

हे देखील वाचा :

Pune Crime | T-20 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यावर बेटींग घेणाऱ्या दोघांना अटक; 4.65 लाखाचा मुद्देमाल जप्त

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 32 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Mutual Funds Sip | 15x15x15 चा फार्म्युला वापरून करोडपती बनने सोपे, वयाच्या 50 व्या वर्षी होऊ शकता 10 कोटीचे मालक; जाणून घ्या

Related Posts