IMPIMP

NCP Chief Sharad Pawar | ‘संभाजी भिडेंना व्यक्तीश: ओळखत नाही’ – शरद पवार

by nagesh
NCP Chief Sharad Pawar | NCP chief sharad pawar i dont know sambhaji bhide personally sharad pawar made it clear

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन NCP Chief Sharad Pawar | पुणे जिल्ह्यातील कोरेगाव – भीमा (Koregaon-Bhima) येथे 2018 मध्ये घडलेल्या हिंसाचार प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी अनेक गंभीर आरोप केले होते.
याप्रकरणी आता शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांना आपण व्यक्तीश: ओळखत नसल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, संभाजी भिडे यांचे नाव कोरेगाव – भीमा दंगलीच्या खटल्यातून वगळण्यात आले आहे.
संभाजी भिडे यांच्याविरोधात पुरेसे पुरावे न आढळल्याने त्यांचे नाव वगळल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांनी (Pune Rural Police) राज्य मानवी हक्क आयोगाला (State Human Rights Commission) दिली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

दरम्यान, कोरेगाव – भीमा चौकशीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांची आज (गुरूवारी) आयोगासमोर साक्ष नोंदवण्यात आली आहे.
या दरम्यान शरद पवार यांनी चौकशी आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती जय नारायण पटेल (Retired Justice Jay Narayan Patel)
आणि सदस्य सुमित मलिक (Sumit Malik) यांच्यासमोर आपलं म्हणणं मांडलं आहे.
संभाजी भिडे (Sambhaji Bhide) आणि मिलिंद एकबोटे (Milind Ekbote) यांना आपण व्यक्तीश: ओळखत नाही.
वर्तमानपत्रांमध्ये त्यांच्याबद्दल वाचल्यामुळे त्यांच्याबद्दल मला माहिती असल्याचं,’ ते म्हणाले.

यानंतर, ”कोरेगाव – भीमा येथील दंगल प्रकरणात शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांचा सहभाग नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
त्यामुळे अकारण हिंदुत्ववादी संघटनांवर आरोप केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्राची माफी मागावी,” अशी मागणी शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक नितीन चौगुले (Nitin Chowgule) यांनी केली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

नेमकं प्रकरण काय ?
कोरेगाव – भीमा दंगलीत संभाजी भिडे यांचा हात असल्याची तक्रार शिक्रापूर पोलीस ठाण्यात (Shikrapur Police Station) नोंदवली होती.
या प्रकरणी 41 आरोपींवर वर्षभरापूर्वीच आरोपपत्र दाखल केले गेले. त्यात संभाजी भिडे यांचे नाव नसल्याची माहिती पोलिसांनी राज्य मानवी हक्क आयोगासमोर असलेल्या सुनावणी दरम्यान दिली आहे.
ठाण्यातील ॲड. आदित्य मिश्रा (Adv. Aditya Mishra) यांनी संभाजी भिडे यांच्याशी संबंधित प्रकरणाची सुनावणी होत नसल्याचे सांगत त्यातून यांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन होत असल्याची तक्रार आयोगाकडे केली होती.

 

Web Title :- NCP Chief Sharad Pawar | NCP chief sharad pawar i dont know sambhaji bhide personally sharad pawar made it clear

हे देखील वाचा :

Dhule-Solapur Highway Accident | धुळे-सोलापूर महामार्गावर पुलावरुन कार कोसळून भीषण अपघात; चौघे गंभीर जखमी

Appa Londhe Murder Case | कुख्यात गुंड आप्पा लोंढे खून प्रकरणात मुख्य आरोपी विष्णू जाधवसह 6 जणांना जन्मठेप; 9 जणांची निर्दोष मुक्तता

India Post GDS Recruitment | 10 वी उत्तीर्णांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! भारतीय पोस्ट खात्यात 38 हजार रिक्त पदांची बंपर भरती; जाणून घ्या

Related Posts