IMPIMP

NCP Chief Sharad Pawar | …म्हणून शरद पवार यांनी दगडूशेठ मंदिरात न जाता बाहेरूनच हात जोडले

by nagesh
NCP Chief Sharad Pawar | NCP chief sharad pawar returned without taking darshan of Dagdusheth Halwai Ganpati Temple

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन – NCP Chief Sharad Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला (Dagdusheth Halwai Ganpati Temple) भेट देण्यासाठी पुण्यात (Pune) आले होते. यावेळी ट्रस्टमार्फत विश्वस्तांकडून पवार यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर पुढे त्यांनी भिडे वाड्याला भेट दिली. दरम्यान, दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसरात गेल्यावर शरद पवारांनी बाप्पांचे दर्शन का घेतले नाही. असं राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांना विचारले असता त्यांनी याबाबत माहिती दिली आहे.

मंदिरासमोर आल्यावर शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) हे बाप्पांचे दर्शन घेणार असल्याची चर्चा होती. मात्र, शरद पवार गणपती बाप्पाचं दर्शन न घेताच बाहेरुन मुख दर्शन घेऊन परतले. विशेष म्हणजे शरद पवार दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी जाणार होते. परंतु, ऐनवेळी त्यांनी मंदिरात न जाण्याचा निर्णय घेत बाहेरुन दर्शन घेऊन परतले. मी मांसाहार केल्याने मंदिरात बाप्पाच्या दर्शनासाठी न जाता बाहेरुन दर्शन घेतल्याचं पवार यांनी सांगितलं आहे. त्यावेळी त्यांच्यासमवेत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil), शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) आणि राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी उपस्थित होते.

प्रशांत जगताप यांनी सांगितलं की, ”श्रीमंत दगडूशेठ गणपती महाराष्ट्र आणि पुणेकरांच्या आस्थेचं हे प्रतीक असून गणपतीवर अनेकांची श्रद्धा आहे.
मला या गोष्टीचा सार्थ अभिमान आहे की, मला आणि पवारांना काही दोघा – तिघांनी दर्शन घेण्याबाबत विचारले होते.
परंतु, शरद पवार यांनी मांसाहार केला असल्याने मी चुकीचा पायंडा पाडणार नाही.
शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे.” असं जगताप यांनी सांगितलं.

Web Title :- NCP Chief Sharad Pawar | NCP chief sharad pawar returned without taking darshan of Dagdusheth Halwai Ganpati Temple

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

हे देखील वाचा :

PM Crop Insurance Scheme | खूशखबर ! महाराष्ट्रातील जवळपास 9.5 लाख शेतकऱ्यांना पीएम पीकविमा योजनेअंतर्गत कोट्यावधी रुपये मिळणार

Shivsena MP Sanjay Jadhav | ‘पूर्वी जुन्या मित्राने ‘ठोकली’ आता नवीन ठोकतोय ! पुण्यात शिवसैनिकांना पक्षाकडून पाठबळ मिळत नाही, म्हणून..’ – शिवसेना खासदार संजय जाधव

Indian Army Soldiers Vehicle Accident in Turtuk Sector (Ladakh) | लडाखमध्ये 26 सैनिक असलेले वाहन दरीत कोसळले: 7 जवानांचा मृत्यू, अनेकजण जखमी

Chandrakant Patil On Uddhav Thackeray | चंद्रकांत पाटलांचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र म्हणाले – ‘…तर पक्षाच्या नावात ‘शिव’ वापरण्याचा अधिकार नाही’

Aadhaar Card | तुमचं ‘आधार कार्ड’ बनावट तर नाही ना ?; कसं ओळखाल ? जाणून घ्या सोप्या टिप्स

Related Posts