IMPIMP

NCP Chief Sharad Pawar | राज्यपालांनी मर्यादांचं उल्लंघन केलं, शिवाजी महाराजांच्या वक्तव्यावरुन शरद पवारांचा कोश्यारींवर संताप

by nagesh
Maharashtra Political News | if sharad pawar and ajit pawar come with bjp we are ready to welcome them says sudhir mungantiwar

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्याविरुद्ध संतापाची लाट उसळली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी देखील राज्यपालांवर संताप व्यक्त केला आहे. राज्यपाल ही संस्थात्मक पद असलं तर विद्यमान राज्यपालांनी सर्व मर्यादांचं उल्लंघन केल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. तसेच आता यासंदर्भात राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी काय तो निर्णय घ्यावा असेही पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी म्हटले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भातील वादाच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल आज दिल्लीतील उच्चपदस्थांची भेट घेण्यासाठी दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. याच दरम्यान शरद पवार यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचा समाचार घेत उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी राज्यपालांनी सर्व मर्यादा सोडल्याचे सांगतानाच दुसऱ्या दिवशी त्यांनी छत्रपतींचे गुणगान गायल्याचा प्रकार म्हणजे उशीरा आलेले शहाणपण असल्याचा टोला लगावला.

शरद पवार पुढे म्हणाले, राज्यपाल ही एक संस्था आहे, त्याच्या काही मर्यादी आणि बंधन असतात. परंतु छत्रपतींचा उल्लेख करताना त्यांनी सगळ्या मर्यादा सोडल्याचे ते म्हणाले. तसेच राज्यपालांचा विषय आता राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी बघावा असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं. याचा निकाल राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी घ्यावा, अशा व्यक्तीला राज्यपाल पदासारख्या जबाबदाऱ्या देऊ नयेत असेही शरद पवार यांनी म्हटले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

काय म्हणाले होते राज्यपाल?
औरंगाबाद मधील एका कार्यक्रमात बोलताना कोश्यारी म्हणाले, आम्ही जेव्हा शाळेत शिकत होतो,
तेव्हा आमचे शिक्षक आम्हाला विचारायचे की तुमचे आवडते नेते कोण? मग ज्यांना सुभाषचंद्र बोस चांगले वाटायचे,
ज्यांना नेहरू चांगले वाटायचे, ज्यांना गांधीजी चांगले वाटायचे ते त्या त्या व्यक्तींची नाव घ्यायचे.
मला असं वाटतं की जर कुणी तुम्हाला विचारलं की, तुमचे आवडते हिरो किंवा आदर्श कोण आहेत?
तर बाहेर कुठे जायची गरज नाही. इथेच महाराष्ट्रात तुम्हाला ते मिळतील. शिवाजी तर जुन्या काळातले आदर्श आहेत.
मी नव्या युगाविषयी बोलतोय. डॉक्टर आंबेडकरांपासून डॉ. नितीन गडकरींपर्यंत सगळे तुम्हाला इथेच मिळतील, असे कोश्यारी म्हणाले होते.

Web Title :- NCP Chief Sharad Pawar | NCP chief sharad pawar slams governor bhagat singh koshyari for comment on chhatrapati shivaji maharaj

हे देखील वाचा :

Amit Shah On Shraddha Walker Murder Case | ‘ज्याने कोणी श्रद्धा वालकरची हत्या केली असेल त्याला कठोर शिक्षा होईल’; गृहमंत्री अमित शाह यांचे आश्वासन

Pune Pimpri Crime | हृदयद्रावक ! शाळेत निघालेल्या माय-लेकाच्या दुचाकीचा भीषण अपघात, आईसमोरच मुलाचा दुर्दैवी मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील घटना

Ajit Pawar | “लोकांचे लक्ष बेरोजगारी आणि महागाई पासून हटवण्यासाठी संपूर्ण वाद’ – अजित पवार

Related Posts