IMPIMP

NCP Chief Sharad Pawar | ‘निवडणुका एकत्र लढाव्या की वेगवेगळ्या याबद्दल माझ्या पक्षात दोन मतं’; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

by nagesh
NCP chief Sharad Pawar | ncp sharad pawar slams modi government over maharashtra karnataka

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन NCP Chief Sharad Pawar | ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत (OBC Political Reservation
Maharashtra) नुकतंच सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) निवडणूक आयोगाला (Maharashtra State Election Commission) आदेश दिले
आहेत. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम लवकर जाहीर करण्याचे निर्देश दिले. तसेच संबधित निवडणुका ओबीसी
आरक्षणाशिवाय घ्या. असं सांगितल्याने राज्य सरकारला (Maharashtra State Government) एक झटका बसला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर
आता लवकरच निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान या निवडणुकीमध्ये तिन्ही पक्ष एकत्र लढणार का असा सवाल उपस्थित
होत असताना यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

राज्याप्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये तिन्ही पक्ष एकत्र लढणार का ? हा सवाल उपस्थित होतो आहे. यावर शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी पहिल्यांदाच स्पष्ट भूमिका मांडली. ”राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही ओबीसी आरक्षण आहे. त्या ठिकाणी ओबीसी उमेदवार देणार असल्याचं म्हटलं. मात्र निवडणुका एकत्र लढाव्या की वेगवेगळ्या याबद्दल माझ्या पक्षात दोन मतं असल्याचं,” त्यांनी पहिल्यांदाच स्पष्ट केलं आहे. ”प्रत्येकाने आपापल्या चिन्हावर लढावी, असं काहीजण म्हणत आहेत. तर आपण सरकार एकत्र चालवतो, त्यामुळे एकत्र निवडणूक लढवावी असंही,” काहींचं मत असल्याच पवार म्हणाले.

पुढे शरद पवार म्हणाले, ”स्थानिक स्वराज्य संस्थाची निवडणूक 15 दिवसात जाहीर करा हा गैरसमज आहे. मला वाटतं या निवडणूक प्रक्रियेला दोन – अडीच महिने लागतील. जिथं थांबवलं तिथून सुरू करा असा आदेश असल्याचं,” पवार यांनी म्हटलं आहे.

Web Title :- NCP Chief Sharad Pawar | NCP chief sharad pawar speaks on maharashtra local body elections

हे देखील वाचा :

Pune Crime | मैत्रिणीला सोडविण्यासाठी लोहगाव एअरपोर्टमध्ये प्रवेश करणे दोघांना पडले महागात; जाणून घ्या प्रकरण

Akshay Kumar – Manushi Chhillar | मानुषी छिल्लरनं शेअर केले अक्षय कुमार सोबत जबरदस्त फोटो, फोटोतील दोघांची केमिस्ट्री पाहून नेटकरी झाले घायाळ…

SBI Hikes Interest Rates on FDs | SBI ग्राहकांसाठी महत्वाची माहिती ! मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ

Related Posts