IMPIMP

NCP Chief Sharad Pawar | भाजपकडून प्रादेशिक पक्षांना कसं संपवलं जातं, शरद पवारांनी मांडली ‘परफेक्ट’ थिअरी

by nagesh
Sharad Pawar | sharad pawar comment on himachal pradesh and gujarat assembly election 2022 result

बारामती : सरकारसत्ता ऑनलाइन भाजप (BJP) पक्षाचं वैशिष्ट्य म्हणजे ते निवडणुकीच्यावेळी (Election) मित्र पक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढतात. मात्र त्या निवडणुकीत मित्र पक्षाचे लोक कसे कमी निवडून येतील, याची खबरदारी भाजपकडून घेतली जाते, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी केले. बिहारमध्ये (Bihar) नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी भाजपची साथ सोडल्यामुळे झालेल्या सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. यावेळी भाजपकडून प्रादेशिक पक्षांना (Regional Party) कशा प्रकारे संपवले जात आहे, याची एक थिअरी मांडण्याचा प्रयत्न केला. शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) बारामतीत पत्रकारपरिषदेत बोलत होते.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

नितीश कुमार यांची कृती योग्य

पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी नितीश कुमार यांची कृती योग्य असल्याचे सांगितले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (BJP National President J. P. Nadda) यांनी काही दिवसापूर्वी भविष्यात प्रादेशिक पक्ष शिल्लक राहणार नाहीत, असे वक्तव्य केले होते. देशात फक्त भाजप हाच पक्ष राहील, असे नड्डा यांनी सांगितले होते. नितीश कुमार यांची हीच तक्रार आहे.

शिवसेनेत दुही निर्माण करण्याचा प्रयत्न

भाजप त्यांच्यासोबत असलेल्या मित्रपक्षांना हळूहळू संपवते. त्याचं उदाहरण द्यायचे झाले तर,
पंजाबमध्ये (Punjab) अकाली दलासारखा (Akali Dal) मोठा पक्ष भाजप सोबत होता.
प्रकाशसिंह बादल (Prakash Singh Badal) यांच्यासारखे मोठे नेते भाजपची साथ देत होते.
परंतु, अकाली दल हा पक्ष आज जवळपास संपुष्टात आला आहे.
महाराष्ट्रात शिवसेना (Maharashtra Shiv Sena) – भाजप अनेक वर्षे एकत्र होते.
आज भाजपने शिवसेनेची काय अवस्था केली ? भाजपने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना हाताशी धरुन शिवसेनेत दुही निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
हेच चित्र बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) दिसत असल्याचे शरद पवारांनी सांगितले.

अन् नितीश कुमार सावध झाले

महाराष्ट्रात भाजपने शिवसेनेसोबत एकत्र निवडणूक लढवताना त्यांचे कमी आमदार कसे निवडून येतील, याची काळजी घेतली.
बिहारमध्ये हेच दिसायला लागल्याने मुख्यमंत्री नितीश कुमार सावध झाले.
त्यांनी राजीनामा देऊन भाजपपासून वेगळे झाले. त्यांनी पुढील धोका ओळखून वेळेत खबरदारी घेतली.
त्यांच्या राज्याच्यादृष्टीने आणि पक्षाच्या दृष्टीने नितीश कुमार यांनी घेतलेला निर्णय योग्य असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

 

Web Title : –  NCP Chief Sharad Pawar | ncp chief sharad pawar tell how bjp finishes ally parties giving examples of shivsena and nitish kumar

हे देखील वाचा :

Pune Crime | गुंतवणुकीवर 20 टक्के मोबदला देण्याच्या आमिषाने महिला पोलिसाकडून 20 लाखांची फसवणूक

Best Multibagger Penny Stocks 2022 | 7-8 महिन्यापूर्वी होते कवडीमोलाचे, 500% पर्यंत वाढले आहेत हे 5 स्टॉक्स

Nitin Gadkari | ‘आम्ही मंत्री आहोत, त्यामुळे कायदा तोडण्याचा अधिकार’ – नितीन गडकरी

Related Posts