IMPIMP

NCP Chief Sharad Pawar On Bhagat Singh Koshyari | कोश्यारी यांच्या वादग्रस्त विधानानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

by nagesh
Sharad Pawar On Governor Bhagat Singh Koshyari | ncp chief sharad pawar slams governor bhagat singh koshyari for comment on chhatrapati shivaji maharaj

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन NCP Chief Sharad Pawar On Bhagat Singh Koshyari | कोश्यारी यांच्या डोक्यावरच्या टोपीचा रंग आणि
त्यांचे अंत:करण यात काहीही फरक नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. ते एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते.
मुंबई आणि ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास तुमच्याकडे पैसेच शिल्लक राहणार नाहीत. मुंबईला (Mumbai) देशाची
आर्थिक राजधानी म्हणता येणार नाही, असे वादग्रस्त वक्तव्य महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केल्याने राज्यात संतप्त पडसाद उमटत
आहेत. यावर आता पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

शरद पवार म्हणाले, या राज्यपालांबद्दल काय बोलावे. यापूर्वी त्यांनी महात्मा ज्योतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबाबत एक भयानक विधान केले होते. त्यांनी यावेळी वेगळ्या पद्धतीने तीच पुनरावृत्ती केली. महाराष्ट्र किंवा मुंबईबद्दल त्यांनी भाष्य केले. मुंबई किंवा महाराष्ट्र सर्व जातीधर्माच्या लोकांना सोबत घेऊन जाणारे आहे. मुंबईची प्रगती सर्वसामान्यांच्या कष्टातून झाली. असे असताना अशा प्रकारची विधाने करणे हे शहाणपणाचे लक्षण नाही. मी याच्या फार खोलात जात नाही. कारण राज्यपालांच्या टोपीचा रंग आणि अंत:करण यात काही फरक नाही.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्रासंबंधी केलेल्या वादग्रस्त आणि संतापजनक वक्तव्याचे तीव्र पडसाद आज दिवसभर राज्यभरात उमटत आहेत. आमदार रवी राणा आणि भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी कोश्यारींच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. हे दोघे वगळता सर्वच राजकीय पक्षांनी कोश्यारी यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.

यामध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray),
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde),
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (BJP Leader Devendra Fadnavis),
खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut), विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar),
शिवसेना नेत्या सुषमा अंधारे, मनसे प्रवक्ते गजानन काळे (MNS Gajanan Kale),
राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी, सचिन सावंत (Congress Leader Sachin Sawant) इत्यादी सर्वच पक्षाच्या नेत्यांनी राज्यपालांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान सोशल मीडियावर देखील संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title : –  NCP Chief Sharad Pawar On Bhagat Singh Koshyari | NCP Chief sharad pawar criticize bhagat singh koshyari over controversial comment on mumbai

हे देखील वाचा :

MLA Ravi Rana On Bhagat Singh Koshyari | ‘राज्यपाल एक सरळ, सज्जन व्यक्तिमत्व’ – आमदार रवी राणा

CM Eknath Shinde | मुख्यमंत्री शिंदेंचा उध्दव ठाकरेंना इशारा, म्हणाले – ‘आनंद दिघेंबाबत जी घटना घडली, त्याचा मी साक्षीदार, वेळ आल्यावर बोलणार’

Ajit Pawar On Bhagat Singh Koshyari | अजित पवार कोश्यारी यांच्या विधानावर ‘परखड’, म्हणाले – ‘अखंड महाराष्ट्र मराठी माणसांनी घडवला, राज्यपालांनी…’

Related Posts