IMPIMP

NCP Chief Sharad Pawar | पहाटेच्या शपथविधीवर फडणवीसांचा गौप्यस्फोट, शरद पवार म्हणाले – ‘मला वाटलं देवेंद्र हा सुसंस्कृत माणूस आहे…’

by nagesh
NCP Chief Sharad Pawar | sharad pawar reaction on devendra fadnavis claims of morning oath with ajit pawar

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाईन – अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत पहाटे झालेल्या शपथविधीबाबत (Swearing in) अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितले नसले तरी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. अजित पवार यांच्यासोबत झालेला पहाटेचा शपथविधी शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्याशी चर्चा करुनच झाला होता, असा खळबळजनक दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. फडणवीसांच्या या दाव्यावर शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) म्हणाले, मला वाटलं देवेंद्र हा सुसंस्कृत माणूस आहे, सभ्य माणूस आहे. असत्याचा आधार घेऊन ते अशाप्रकारची स्टेटमेंट्स करतील, असं मला कधी वाटलं नाही, असं म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी केलेला दावा फेटाळून लावला.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, आमच्याकडे राष्ट्रवादीकडून (NCP) ऑफर आली, की आम्हाला स्टेबल गव्हर्नमेंट (Stable Government) हवंय, म्हणून आपण सरकार तयार करुया.
राजकारणात जेव्हा एखादा व्यक्ती तुम्हाला धोका देतो, त्यावेळी त्याचा चेहरा पाहत बसता येत नाही.
मग आम्हीही निर्णय केला. आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. जी चर्चा झाली होती ती शरद पवार साहेबांशीच झाली होती.
ती काही खाली झालेली चर्चा नव्हती. शरद पवारांशी चर्चा झाल्यानंतर गोष्टी ठरल्या.
त्या ठरल्यानंतर कशा बदलल्या हे आपण सर्वांनी पाहिलं आहे. त्यामुळे त्याठिकाणीही आमच्या सोबत विश्वासघातच झाला.
पहिला विश्वासघात हा मी जास्त मोठा मानतो, कारण तो आपल्यासोबतच्या व्यक्तीने केला होता, हा लहान होता, असं फडणवीस यांनी सांगितलं.

Web Title :- NCP Chief Sharad Pawar | sharad pawar reaction on devendra fadnavis claims of morning oath with ajit pawar

हे देखील वाचा :

Devendra Fadnavis | पहाटेच्या शपथविधीबाबत शरद पवारांसोबत चर्चा झाली होती! देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट

Maharashtra Politics | काँग्रेससोबत शरद पवारांनी केलेली गद्दारी नव्हती का?, शिंदे गटाच्या नेत्याचा सवाल

Pune Crime News | पुण्यातील अट्टल गुन्हेगार नाशिक कारागृहात स्थानबद्ध, MPDA कायद्यान्वये CP रितेश कुमार यांची 4 थी कारवाई

Related Posts