IMPIMP

NCP MLA Rohit Pawar | ‘बागेश्वर बाबाला उपरती झाली, पण मुंबईत बसलेल्या बाबाला…’ रोहित पवारांचा राज्यपालांना टोला

by nagesh
 NCP MLA Rohit Pawar | rohit pawar slams dhirendra shastri for tukaram comment and bhagat singh koshyari over resignation

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – संतश्रेष्ठ तुकाराम महाराज (Tukaram Maharaj) यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Dhirendra Krishna Shastri) यांनी आपले विधान मागे घेत माफी मागितली आहे. तुकारामांना त्यांची पत्नी मारहाण करत होती म्हणून ते भक्तीमार्गाला लागले, असे वादग्रस्त विधान त्यांनी केलं होतं. यानंतर त्यांच्यावर सर्वच स्तरातून टीका झाल्यानंतर त्यांनी आपले विधान मागे घेतले. दरम्यान, शास्त्रींनी त्यांचे वक्तव्य मागे घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (NCP MLA Rohit Pawar) यांनी धिरेंद्र शास्त्री आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांना टोला लगावला आहे. रोहित पवार (NCP MLA Rohit Pawar) यांनी याबाबत ट्विट केले आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

रोहित पवार (NCP MLA Rohit Pawar) यांनी ट्विटरवरुन धिरेंद्र शास्त्री आणि राज्यपाल यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की,’बागेश्वर बाबाला उपरती झाल्याने त्याने जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकोबारायांबद्दलचं विधान मागे घेतलं…. पण मुंबईत समुद्र किनाऱ्यावर बसलेल्या बाबाला परतीचे वेध लागले तरी उपरती होत नाही, हे दुर्दैव आहे!’ राज्यपालांचा बंगला मुंबईत मलबार हिल (Malabar Hill) येथे समुद्र किनाऱ्यावर आहे. त्यामुळे रोहित पवारांनी नाव न घेता राज्यपालांना टोला लगावला आहे.

दरम्यान, अलिकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे मुंबई दौऱ्यावर आले होते.
त्यावेळी राज्यापालांनी आपल्याला राज्यपाल पदाच्या जबाबदारीतून मुक्त करावं, अशी इच्छा व्यक्त केली होती.
मात्र, त्यांनी अद्याप राजीनामा दिलेला नाही. त्यामुळे ते सध्या विरोधकांच्या निशाण्यावर आहेत.
आमदार रोहित पवार यांनी देखील आज राज्यपालांना नाव न घेता टोला लगावला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- NCP MLA Rohit Pawar | rohit pawar slams dhirendra shastri for tukaram comment and bhagat singh koshyari over resignation

हे देखील वाचा :

BJP MLA Nitesh Rane | उद्धव ठाकरेंवर टीका करताना नितेश राणेंची जीभ घसरली, म्हणाले-‘उद्धव ठाकरे हे नाXX…’

Budget 2023 | अर्थसंकल्पातील शेतकऱ्यांसाठीच्या योजनांवरून राजू शेट्टींनी केंद्र सरकारला फटकारले; म्हणाले…

Pune By Elections | कसब्याची जागा आपल्या पारड्यात पाडून घेण्यासाठी महाविकास आघाडीत रस्सीखेच! इच्छुकांची मोठी यादी

Related Posts