IMPIMP

NCP | भाजपकडून शिंदे गटाला ‘रसद’, दसरा मेळाव्यासाठी दिल्लीतून येतोय पैसा, राष्ट्रवादीचा आरोप

by nagesh
NCP | money is coming from delhi to shinde group ncps serious allegation from dussehra gathering of bkc shivsena

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – NCP | छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), नारायण राणे (Narayan Rane) व राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी बंड केले किंवा पक्ष सोडला, पण शिवसेनेवरच (Shivsena) दावा सांगण्याचा उद्दामपणा यापैकी कोणीच केला नव्हता, हे भाजपाचेच (BJP) कारस्थान आहे, असा आरोप काल शिवसेनेने आपल्या मुखपत्रातून केला होता. आज राष्ट्रवादीने (NCP) सुद्धा अशाच प्रकारचा आरोप शिंदे गटाच्या (Shinde Group) दसरा मेळाव्याच्या (Dasra Melava 2022) अवाढव्य खर्चासंदर्भात केला आहे. शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी दिल्लीतून पैसा येतोय, असा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला शुभेच्छा देण्यासाठी राष्ट्रवादीने मुंबईत बॅनर्स लावल्याने आता राष्ट्रवादी विरूद्ध भाजपा आणि शिंदे गट असे आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

राष्ट्रवादीचे (NCP) प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी भाजपावर गंभीर आरोप करताना म्हटले की, आरोप करणारे करत असतात, आता आम्हीही बातमी वाचली की शिंदे गटाच्या बीकेसी मैदानातील (BKC Ground) मेळाव्याला महाराष्ट्रात 3 हजार बसेस येत आहेत. मग, या खर्चासाठी कोण स्पॉन्सर्स करत आहे. भाजपाच या गटाला पैसा पुरवत आहे, दिल्लीतून पैसा येतोय. दोन महिनेच झालेत यांना, अजून यांचा पक्ष नाही, संघटनेची नोंद नाही, अधिकृत मान्यता नाही. तरीही अशा पद्धतीने पैसा खर्च केला जातोय, तो कोठून येतो, असा सवाल तपासे यांनी उपस्थित केला आहे.

महेश तपासे यांनी म्हटले की, महाविकास आघाडीचे सरकार (Maha Vikas Aghadi Government) आल्यापासून उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) शिवसेना हीच खरी शिवसेना अशी धारणा आमची आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना हीच बाळासाहेब ठाकरेंची (Balasaheb Thackeray) शिवसेना असल्याची धारणा राष्ट्रवादीसह महाराष्ट्राच्या जनतेची आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातही तीच भावना आहे. न्यायालयानेही शिवाजी पार्क (Shivaji Park) येथे दसरा मेळावा घेण्यास ठाकरेंना परवानगी दिली आहे. त्यामुळे, कुठेतरी वेगळा दसरा मेळावा घेऊन लोकांना भ्रमित करण्याचा प्रयत्न आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

दरम्यान, शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला शुभेच्छा देणारे बॅनर्स राष्ट्रवादीने लावल्याने भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
आज शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला शुभेच्छा देण्यासाठी मुंबईत मातोश्रीच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेसने सुद्धा शुभेच्छा देणारे बॅनर्स लावले आहेत.
मातोश्रीबाहेर लावलेला बॅनर सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
दसरा मेळाव्याची परंपरा कायम राहावी यासाठी राष्ट्रवादीने मुंबईत हे बॅनर्स लावले आहेत.
या बॅनरवर शरद पवार (Sharad Pawar), अजित पवार (Ajit Pawar), सुप्रिया सुळे (Supriya Sule),
जयंत पाटील (Jayant Patil), छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), दिलीप वळसे पाटील
(Dilip Valse Patil), सचिन अहिर (Sachin Ahir), आदित्य ठाकरे (Aditya Thackeray),
उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आहे.

एक संघटना, एक विचार आणि एकच मैदान शिवसेनेचा दसरा मेळावा परंपरा अखंड राहू द्या, खूप खूप शुभेच्छा,
असे म्हणत राष्ट्रवादीने शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
राष्ट्रवादीचे मुंबई सचिव दिनेशचंद्र हुलवळे, राजू घुगे यांनी हे बॅनर्स लावले आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- NCP | money is coming from delhi to shinde group ncps serious allegation from dussehra gathering of bkc shivsena

हे देखील वाचा :

Udayanraje Bhosale | रयत शिक्षण संस्थेचे नाव बदलून पवार शिक्षण संस्था करा : उदयनराजे भोसले

MNS On Shivsena | मनसेची शिवसेनेवर टीका, शिवतीर्थावरच्या टोमणे मेळाव्यासाठी मांडवली झाली म्हणे… मी तुझ्याकडे, तू माझ्याकडे गर्दी कर

Gopichand Padalkar | शरद पवारांनी बहुजनांच्या जिवावर राजकारण करत बहुजनांचाच घात केला : गोपीचंद पडळकर

Related Posts