IMPIMP

NCP MP Supriya Sule | ‘राष्ट्रवादीच्या ‘एकाच मंत्र्याच्या घरी 109 वेळा छापे, याची विश्वविक्रमात नोंद होऊ शकते’ – सुप्रिया सुळे

by nagesh
NCP MP Supriya Sule | 109 times raid on deshmukh family should make it to limca book of records said supriya sule

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन NCP MP Supriya Sule | मागील अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) अटकेत आहेत. ईडीने (ED) केलेल्या कारवाईवरुन आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांनी टीकास्त्र सोडलं आहे. ‘अनिल देशमुख यांच्या घरी 109 वेळा छापे टाकण्यात आले. 108 वेळा ईडीला काही मिळाले नाही का ?’ असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

त्यावेळी बोलताना सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) म्हणाल्या, “एकाच व्यक्तीच्या घरी इतक्या वेळा छापे टाकण्याचा हा विश्वविक्रम होऊ शकतो, याची लिम्का बूकमध्ये नोंद होऊ शकते,” अशी जोरदार टीका त्यांनी केली आहे.
‘आमचे दोन नेते काहीही चुकीच न करता तुरुंगात आहेत. हा आमच्यावर आणि आमच्या दोन्ही नेत्यांवर अन्याय आहे.
आमचा न्यायालयावर विश्वास आहे. आम्हाला आज ना उद्या न्याय ज्या पद्धतीने केंद्र सरकार (Central Government) केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत आहे तसे आजवर कधीही झालेले नसल्याचं देखील त्या म्हणाल्या.

दरम्यान, “राज्यसभेच्या निवडणुकीत (Rajya Sabha Elections) अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना
मतदानाची संधी मिळावी यासाठी राष्ट्रवादी नेते व मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) प्रयत्न करीत असल्याचेही,” सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

 

Web Title :- NCP MP Supriya Sule | 109 times raid on deshmukh family should make it to limca book of records said supriya sule

हे देखील वाचा :

Jan Samarth Portal | ‘जन समर्थ पोर्टल’चे PM मोदींच्या हस्ते उद्घाटन; नेमकं ‘हे’ पोर्टल आहे तरी काय ? जाणून घ्या

Corona in Maharashtra | मंत्री विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान; म्हणाले – ‘सध्याची कोरोना रूग्णसंख्या वाढ हे चौथ्या लाटेचेच संकेत’

Gopichand Padalkar On Sharad Pawar | आमदार गोपीचंद पडळकरांची जीभ घसरली; शरद पवारांवर खालच्या पातळीवर टीका

Related Posts