IMPIMP

NCP Rohit Pawar On Shinde-Fadnavis Govt | वा रे सत्ताधारी ! टॅक्समध्ये महाराष्ट्र करतोय सर्वाधिक ‘पे’, युवकांना मात्र बेरोजगारीचा ‘वे’, रोहित पवारांचा निशाणा

by nagesh
Rohit Pawar | rohit pawar slams bjp over kasba bypoll election candidacy

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – NCP Rohit Pawar On Shinde-Fadnavis Govt | वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प (Vedanta-Foxconn Project) गुजरातला गेल्याने महाराष्ट्रात उठलेले आरोप-प्रत्यारोपाचे वादळ अद्याप शांत झालेले नसतानाच आणखी एक धक्कादायक वृत्त समोर आले आहे. आता PhonePe या दिग्गज कंपनीने महाराष्ट्राच्या बाहेर आपले बस्तान हलविण्याचा निर्णय घेतला आहे. फोनपे (Phone Pe) आपले कार्यालय मुंबईतून कर्नाटकमध्ये स्थलांतरीत करणार आहे. यासंदर्भातील माहिती कंपनीने एका जाहिरातीद्वारे दिली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या अकार्यक्षमतेवर निशाणा साधला आहे. (NCP Rohit Pawar On Shinde-Fadnavis Govt)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

फोनपेचे कार्यालय मुंबईतून कर्नाटकमध्ये स्थलांतरीत होत असल्याने रोहित पवार यांनी एक ट्विट करून शिंदे-फडणवीस सरकारवर बाण सोडला आहे. या ट्विटमध्ये म्हटले आहे की, फोन पे डेबिटेड फ्रॉम महाराष्ट्र, क्रेडिटेड टू कर्नाटक. वेदांतानंतर #PhonePe ची बारी. गब्बर होतायेत शेजारी, महाराष्ट्र पडतोय आजारी, वा रे सत्ताधारी. टॅक्समध्ये महाराष्ट्र करतो सर्वाधिक पे, महाराष्ट्राच्या युवांना मात्र बेरोजगारीचा वे. (NCP Rohit Pawar On Shinde-Fadnavis Govt)

फोन पे कंपनीने एका वृत्तपत्रात सार्वजनिक नोटीस प्रसिद्ध केली असून यात आपले मुंबईतील कार्यालय कर्नाटकात
स्थलांतरीत करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.
या नोटीसमध्ये पुढे म्हटले आहे की, कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय महाराष्ट्रातून कर्नाटक राज्यात हलविण्यासाठी
कंपनी कायदा 2012 च्या कलम 13 अंतर्गत केंद्र सरकारकडे अर्ज करण्यात आला आहे.
ज्यासाठी कंपनी मेमोरँडम ऑफ असोसिएशनमध्ये फेरफार करण्यासंदर्भात 16 ऑगस्ट 2022 रोजी घेण्यात आलेल्या सभेत ठराव मंजूर केला आहे.

दरम्यान, वेदांता-फॉक्सकॉन नंतर शिंदे-फडणवीस सरकारला हा दुसरा धक्का आहे.
वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे दीड लाखांपेक्षा अधिक रोजगाराच्या संधी बुडाल्या आहेत.
आता फोन पे चे कार्यालय कर्नाटकमध्ये स्थलांतरित होत असल्याने हा महाराष्ट्रासाठी चांगला संकेत नाही.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- NCP Rohit Pawar On Shinde-Fadnavis Govt | ncp leader rohit pawar targets eknath shinde government over phone pe exits from maharashtra to karnataka

हे देखील वाचा :

Eknath Shinde Group Vs Uddhav Thackeray | शिंदे गटाचे उद्धव ठाकरे यांना आव्हान, म्हणाले – ‘तुम्ही शिवाजी महाराजांचा फोटो काढा, आम्ही…’

Pune News | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या स्वागत कमानीवर काळे फासले; धनकवडी येथील अहिल्यादेवी चौकातील घटना

Maharashtra Cabinet Expansion | दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाला पाहिजेत ‘ही’ खाती

Related Posts