IMPIMP

CBSC नंतर आता ‘ही’ परीक्षा केंद्र सरकारने ढकलली पुढे

by Team Deccan Express
neetpg2021 postponed

नवी दिल्ली : देशभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे हा संसर्ग रोखण्यासाठी विविध पावले उचलली जात आहेत. त्यानुसार, आत्तापर्यंत विविध परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यानंतर आता केंद्र सरकारने NEET PG-2021 परीक्षाही पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

NEET PG-2021 परीक्षा पुढे ढकण्याच्या निर्णयाची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली. त्यामध्ये त्यांनी म्हटले, की ‘कोरोना व्हायरसच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने NEET PG–2021 परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. ही परीक्षा 18 एप्रिल रोजी होणार होती. आता परीक्षेची पुढची तारीख नंतर ठरवली जाणार आहे. मेडिकल विद्यार्थ्यांच्या आरोग्य हिताच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.’

‘अजित पवार सत्तेसाठी हपापलेले, जास्त गमजा मारू नका, कालचक्र फिरत असतं’; चंद्रकांत पाटलांचा टोला

दरम्यान, केंद्र सरकारने सीबीएसईच्या (CBSE) दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला होता. राज्यात कोरोना व्हायरसचा वाढता संसर्ग पाहता ठाकरे सरकारने वैद्यकीय शिक्षण विभागाच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. याशिवाय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची 11 एप्रिल रोजी होणारी परीक्षाही कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर आता NEET PG–2021 परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.

Also Read :

Rohit Pawar : ‘राज्यातील निर्बंधांचा अनेकांना त्रास होऊ शकतो, पण…’

स्मृती इराणींचा ममता बॅनर्जीवर हल्लाबोल, म्हणाल्या – ‘कोरोनासाठी मोदी-शहांना जबाबदार धरणे यातून ममतांचे संस्कार दिसतात’


Coronavirus in India : ‘कोरोना’ने सर्वच रेकॉर्ड मोडले ! गेल्या 24 तासांत 2 लाखांहून अधिक रुग्ण, सलग दुसऱ्या दिवशी 1 हजाराहून जास्त रुग्णांचा मृत्यू

अजित पवारांचा फडणवीसांना सणसणीत टोला, म्हणाले -‘आपला नाद कुणी करायचा नाही, सरकार पाडणं हे कोणा येरा गबाळ्याचं काम नाही’

100 कोटींचे खंडणी प्रकरण : CBI कडून माजी ग्रहमंत्री अनिल देशमुखांची साडेआठ तास चौकशी

चंद्राकांत पाटलांचा दावा, म्हणाले- ‘पुढील महिन्यात ‘या’ तारखेला राज्यातील सत्तेला नक्कीच सुरुंग’

Related Posts