IMPIMP

New Covid-19 Guidelines | राज्य सरकारची नवी नियमावली जारी ! व्हेरिएंटच्या धोक्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा निर्बंध लागू

by bali123
News Covid-19 Guidelines | maharashtra government issues fresh covid 19 guidelines wake new variant omicron marathi news

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – New Covid-19 Guidelines | कोरोनाच्या दोन्ही (Corona virus) लाटेनंतर नुकतंच महाराष्ट्र सावरला होता. कोरोनाच्या परिस्थिती नियंत्रणात आल्याने सर्व सेवा पुर्ववत केल्या आहेत. दरम्यान, मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या (New Covid-19 Guidelines) वाढत्या बाधितांमुळे पुन्हा एकदा राज्य सरकार (Maharashtra Government) सावध झालं आहे. अशा परिस्थितीत दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळेही (Variant) चिंता वाढलेली आहे. या पार्श्वभुमीवर केंद्र सरकारने (Central Government) सर्व राज्यांना पत्र लिहून सावधानतेच्या सुचना (Corona’s new rules) देण्यात आल्या आहेत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , TelegramFacebook page for every update

कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभुमीवर केंद्र सरकारने (Central Government) राज्यांना सुचना दिल्या आहेत. तसेच, परदेशातून येणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत विशेष खबरदारी घ्यावी असं देखील केंद्र सरकराकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान, महाराष्ट्रात कोरोना परिस्थितीचा आढावा घेत नागरिकांसाठी नवी नियमावली (New Covid-19 Guidelines) जारी करण्यात आली आहे. नव्या नियमावलीनूसार सार्वजनिक वाहतूकीत फक्त पूर्ण लसीकरण (Vaccination) झालेल्यांनाच प्रवास करण्यास परवानगी देण्यात आलीय. त्यासोबत मॉल, सभागृह, कार्यक्रम याठिकाणी कोरोना प्रतिबंधक लसीचे 2 डोस असलेल्यांनाच प्रवेश देण्यात येणे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, केंद्र सरकारने सर्व राज्यांना अलर्ट केलेय. केंद्रानॆ पत्र लिहून राज्यांना आदेश दिले आहेत की, सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांची कठोर तपासणी करा. दक्षिण आफ्रिका, हाँगकाँग आणि बोत्सवाना येथून येणाऱ्या प्रवाशांची स्क्रिनिंग करा. याबाबत पत्र केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण (Secretary Rajesh Bhushan) यांनी राज्यांना लिहिलं आहे. तर, यानुसार राज्य सरकारकडून सार्वत्रिक पास देण्यात आले आहेत. प्रवास करताना लसीकरण प्रमाणपत्र (Vaccination certificate) आणि फोटो ओळखपत्र असणं अनिवार्य केले गेले आहे.

नव्या नियमावली काय?

– रिक्षा, टॅक्सी, बस, कॅबमध्ये लसीचे 2 डोस घेतलेल्यांनाच प्रवास करता येईल.
यापुढे सार्वजनिक अथवा खासगी वाहनात केवळ पूर्ण लसीकरण झालेल्यांनाच प्रवेश मिळणार आहे. लस घेतली नसेल तर प्रवास करता येणार नाही.

– महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना पूर्ण लसीकरण असलेले प्रमाणपत्र (Vaccination certificate)
किंवा प्रवासाच्या 72 तास आधीचा RT PCR टेस्ट अहवाल देणे बंधनकारक

– सिनेमा हॉल, लग्नाचे हॉल, सभागृह याठिकाणी क्षमतेच्या 50 टक्के लोकांनाच उपस्थित राहता येईल.

– मास्क न घालने 500 रुपये दंड, दुकानात ग्राहकाकडे मास्क न घातल्यास दुकानदाराला 10 हजार दंड, तर मॉलमध्ये कुणी मास्क न घातल्यास मालकाला 50 हजार दंड.

– राजकीय सभा, कार्यक्रमात कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यास 50 हजार दंड.

– भारत-न्यूझीलंड मॅच पाहण्यासाठी फक्त 25 टक्के लोकांनाच उपस्थिती असणार आहे.

– टॅक्सी किंवा खासगी वाहनात मास्क न घातल्यास 500 रुपये दंड तसेच वाहन मालकासही 500 रुपये दंड ठोठावण्यात येईल.

– किमान 6 फूट अंतर राहील असं सोशल डिस्टेंसिंगचं (Social distance) पालन करावे लागणार आहे.

Web Title :- News Covid-19 Guidelines | maharashtra government issues fresh covid 19 guidelines wake new variant omicron marathi news

Related Posts