IMPIMP

Nifty Rejig | अंबानींना धक्का, टाटांना लाभ! ऑगस्टमध्ये होऊ शकतात निफ्टीमध्ये ‘हे’ बदल

June 12, 2024

नवी दिल्ली : Nifty Rejig | देशातील प्रमुख शेयर बाजार एनएसईच्या निर्देशांकात पुढील दोन महिन्यात फेरबदल होणार आहेत. प्रस्तावित फेरबदलामध्ये काही शेयर्सला फायदा होणार आहे आणि त्यांना प्रमुख इंडेक्स निफ्टी ५० मध्ये स्थान मिळणार आहे, तर काही शेयरला बाहेरची वाट धरावी लागू शकते.

जेएम फायनान्शियलने ऑगस्टमधील संभाव्य बदलांपूर्वी एका पत्रकात संभाव्य शेयरची माहिती दिली आहे. निफ्टी इंडेक्समध्ये प्रस्तावित बदलांची घोषणा ऑगस्टमध्ये होईल, तसेच हे बदल ३० सप्टेंबरपासून लागू होतील.

निफ्टीच्या इंडेक्समध्ये हे बदल अ‍ॅव्हरेज फ्री फ्लॉट मार्केट कॅपच्या आधारावर केले जातात. प्रमुख निर्देशांक निफ्टी५० मध्ये यानुसार ५० सर्वात मोठ्या लिस्टेड कंपन्यांच्या शेयर्सला स्थान मिळते.

ब्रोकरेज फर्मच्या हिशेबानुसार, टाटा समुहाच्या ट्रेंटला निफ्टी५० मध्ये स्थान मिळू शकते. त्यांचे टोटल एम कॅप १.७५ लाख कोटी रुपये आणि फ्री फ्लॉट मार्केट कॅप १.०८ लाख कोटी रुपयांच्या जवळपास आहे.

जेएम फायनान्शियलच्या हिशोबानुसार बीईएलला सुद्धा एंट्री मिळू शकते, जिचे मार्केट कॅप सध्या २.०९ लाख कोटी रुपये आहे, तर तिचे फ्री फ्लॉट एमकॅप जवळपास १.०३ लाख कोटी रुपये आहे.

फूड डिलिव्हरी फर्म झोमॅटोला सुद्धा बाहेर पडावे लागू शकते. या शेयरचे सध्याचे बाजार भांडवल १.६२ लाख कोटी रुपये आहे, तर तिचे फ्री फ्लॉट मार्केट कॅप सध्या सुमारे १.०७ लाख कोटी रुपये आहे.

नुकसान होऊ शकते, अशा शेयरमध्ये रिलायन्सच्या जियो फायनान्शियलचा समावेश आहे. तिचे एकुण मार्केट कॅप २.२३ लाख कोटी रुपये आहे, तर फ्री फ्लॉट मार्केट कॅप १.१३ लाख कोटी रुपये आहे.