IMPIMP

Nilesh Rane | ‘पिसाळलेल्या कुत्र्याचं काय करायचं, हे मला वेगळं सांगण्याची गरज नाही’, निलेश राणेंची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका

by nagesh
Nilesh Rane | bjp leader nilesh rane on shivsena chief uddhav thackeray

सिंधुदुर्ग : सरकारसत्ता ऑनलाइन  भाजपचे (BJP) नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) यांच्यावर टोकदार शब्दात टीका केली आहे. उद्धव ठाकरेंची अवस्था पिसाळलेल्या कुत्र्यासारखी झाली आहे, पिसाळलेल्या कुत्र्याचं काय करायचं, हे मला वेगळं सांगण्याची गरज नाही, अशा शब्दात निलेश राणे (Nilesh Rane) यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. ते सिंधुदुर्गमध्ये प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (Shinde Group MLA Santosh Bangar) यांच्या गाडीवर हल्ला झाला होता. यावर भाष्य करताना निलेश राणे (Nilesh Rane) म्हणाले, उद्धव ठाकरे असे पिसाळले आहेत, की त्यांना काय करावं हेच सुचत नाही. आणि पिसाळलेल्या कुत्र्याचं काय करायचं? हे मला वेगळं सांगायची गरज नाही. अशा पिसाळलेल्या लोकांचं काय करायचं, हे मी सकाळीच सांगितलं आहे. ते ठाकरे आहेत, त्यांना त्यांच्या भाषेत उत्तर द्यावं लागतं. त्यांच्याविरोधात काही गोष्टी कडकच घेतल्या पाहिजेत.

काल संतोष बांगर यांच्या गाडीवर अमरावतीत हल्ला (Attack) झाला. त्यामुळे ते चांगल्या भाषेत ऐकणार नाहीत,
असं दिसतंय. त्यांना फटकेच द्यायला पाहिजे.
त्यांना त्याच भाषेत बोललं पाहिजे कारण त्यांना दुसरी भाषा कळत नाही.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आपल्या पहिल्या भाषणापासून सांगत आहेत की, आमचा संयम तोडू नका. पण जर यांना संयम तोडायचा असेल तर कधी ना कधी दोन हात होणारच. त्यासाठी उद्धव ठाकरेंनी तयार रहावं, असा धमकीवजा इशाराही राणे यांनी दिला.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या गाडीवर अमरावतीत काही शिवसैनिकांनी हल्ला केला.
बांगर त्यांची बहीण आणि पत्नीसह देवदर्शनाला आले होते.
त्यावेळी दर्शन घेऊन बाहेर पडल्यानंतर त्यांच्या गाडीवर काही शिवसैनिकांनी हल्ला केला.
‘आला रे आला, गद्दार आला’, ’50 खोके, एकदम ओके’ अशा घोषणाही यावेळी शिवसैनिकांनी दिल्या.

Web Title :- Nilesh Rane | bjp leader nilesh rane on shivsena chief uddhav thackeray

हे देखील वाचा :

Arthritis | यूरिक अ‍ॅसिड असे करा कंट्रोल, ‘या’ 5 उपायांनी होऊ शकते सांधेदुखीपासून सुटका

LIC Policy Rules | एलआयसी पॉलिसीचे हे काम लवकर करा, अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान, बदलले नियम; जाणून घ्या

Beed ACB Trap | 7000 हजार रुपये लाच घेताना तलाठी आणि खासगी व्यक्ती अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Murder Case | वडगाव बुद्रुक परिसरात मैत्रिणीबरोबर गप्पा मारत बसलेल्या मुलाचा खून करणारे अटकेत

Related Posts