IMPIMP

Nilesh Rane Criticizes CM Uddhav Thackeray | निलेश राणेंची उध्दव ठाकरे यांच्यावर खोचक टीका, म्हणाले – ‘मेव्हणा पकडला अन् मुख्यमंत्री बाहेर आले’

by nagesh
Nilesh Rane | bjp leader nilesh rane slams ex cm uddhav thackeray over sanjay pandey arrest by ed

रत्नागिरी : सरकारसत्ता ऑनलाइन Nilesh Rane Criticizes CM Uddhav Thackeray | मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे ते कोणत्याही कार्यक्रमांना, बैठका आणि मागील अधिवेशनालाही मुख्यमंत्री उपस्थित नव्हते. यावरून अनेकवेळा विरोधी नेत्यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला होता. मात्र आता चालू असलेल्या अधिवेशनाला मुख्यमंत्री उपस्थित होते आणि त्यांनी सभागृहात भाषणही केलं. याचाच धागा पकडत भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. (Nilesh Rane Criticizes CM Uddhav Thackeray)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

मागील दोन वर्षे मुख्यमंत्री कोणालाही दिसले नाहीत. आता मेहुणा पकडला गेला आणि मुख्यमंत्री बाहेर आले, अशी खोचक टीका निलेश राणे यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar) यांच्यावर ईडीने (ED) कारवाई केली. या कारवाईमध्ये त्यांचे 11 फ्लॅट जप्त केले होते. पाटणकरांची एकूण 6.45 कोटींची मालमत्ता ईडीने जप्त केली होती.

मुख्यमंत्र्यांचा मेहुणा पकडला गेल्याने ही तडफड आहे. इतके वर्ष मुख्यमंत्री दिसले नाही.
मुख्यमंत्रीही असे मिळालेत की ज्यांना महाराष्ट्र कळला नाही, विधिमंडळ (Legislature) कळले नाही.
दोन वर्ष मुख्यमंत्री दिसले नाहीत, मात्र मेहुणा पकडला गेला म्हणून मुख्यमंत्री बाहेर आले असल्याचं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.
यावेळी बोलताना राणेंनी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या भाषणावरूनही त्यांच्यावर निशाणा साधला.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी केलेलं भाषण हे विधानसभेत नव्हतं तर सेना भवनातलं (Sena Bhavan) भाषण होतं.
मुख्यमंत्री हे मुख्यमंत्र्यासारखं बोलत नाहीत. टोमणं मारणं म्हणजे मुख्यमंत्र्यांचं भाषण नसतं, असं निलेश राणे म्हणाले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Nilesh Rane Criticizes CM Uddhav Thackeray | BJP leader narayan rane son nilesh rane criticizes chief minister uddhav thackeray and his speech and kirit somayya dapoli visit

हे देखील वाचा :

Pune Crime | औंध गावात मैत्रिणीसोबत पार्किंगमध्ये खेळणाऱ्या 10 वर्षाच्या चिमुकलीचा विनयभंग; चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात FIR

Nargis Fakhri Superbold Look | वयाच्या 42 व्या वर्षी अनेक अभिनेत्रींना फिकी पाडते ‘ही’ सुंदर अभिनेत्री, पाहा तिचा सुपरबोल्ड लूक

Best 23 Penny Stocks List | ‘या’ 23 पेनी स्टॉकद्वारे FY22 मध्ये झाला पैशांचा पाऊस, काही बनले ‘लखपती’ तर काही ‘करोडपती’!

Related Posts