IMPIMP

Nilesh Rane On Uddhav Thackeray | ‘आता, शिवसेनेच्या 11-12 आमदारांना घेऊन IPL टीम बनवा’; भाजप नेते निलेश राणेंचा टोला

by nagesh
Nilesh Rane | bjp leader nilesh rane slams ex cm uddhav thackeray over sanjay pandey arrest by ed

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइन Nilesh Rane On Uddhav Thackeray | शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण प्रचंड तापलं आहे. एकनाथ शिंदेसह पस्तीस ते चाळीस आमदार सध्या गुवाहटीमध्ये आहेत. भाजपसोबत (BJP) युती करा असं एक आव्हानच शिंदे गटांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना दिलं आहे. त्यामुळे शिवसेनेसह (Shivsena) महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठा धक्का बसला आहे. अशातच अनेक राजकीय घडामोडींवर तर्क वितर्क लढवले जात आहेत. यानंतर भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी ट्विट करत शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. (Nilesh Rane On Uddhav Thackeray)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

निलेश राणे यांनी ट्वीट करून शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे. निलेश राणे यांनी सध्या शिवसेनेसोबत असलेल्या आमदारांच्या आकडेवारीवरून शिवसेनेवर टीका केली आहे. शिवसेनेपेक्षा अधिक आमदारांची संख्या सध्या मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत आहे. त्यामुळे शिवसेनेकडील आमदारांची संख्या पाहता, शिवसेनेने आता IPL टीम सुरु करावी, अशी जोरदार टीका निलेश राणे यांनी केली आहे. त्याचबरोबर, पक्ष चालवणं हे उद्धव ठाकरेंचं काम नाही, असे म्हणत त्यांनी टीमसाठी त्यांनी नावही सुचवलं आहे. (Nilesh Rane On Uddhav Thackeray)

“शिवसेनेचे 11/12 आमदार शिवसेने सोबत राहतील अशी परिस्थीती आहे, पक्ष चालवणं उद्धव ठाकरेंचं काम नाही. हे 11/12 घेऊन IPL team साठी तयारी करा… मातोश्री 11 बनवा.” असं ट्विट निलेश राणेंनी केलं आहे. दरम्यान, विधानपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. त्याच रात्री राज्याच्या राजकारणात भूकंप आणणारं बंड शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंनी पुकारले. एकनाथ शिंदे हे 20 -22 आमदारांसोबत सूरतला दाखल झाले. त्यानंतर मंगळवारी सूरतमध्ये घडलेल्या सर्व राजकीय नाट्यानंतर एकनाथ शिंदेंसह जवळपास 35 ते 40 आमदारांना गुवाहटीला हलवण्यात आले आहे. सध्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत 45 आमदारांचा पाठिंबा आहे असं एकनाथ शिंदेंचा दावा आहे. त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणाला नवं वळण मिळालं आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Nilesh Rane On Uddhav Thackeray | ‘Now, form an IPL team with 11-12 Shiv Sena MLAs’; BJP leader Nilesh Rane

हे देखील वाचा :

Demat Account KYC | 8 दिवसात डिमॅट अकाऊंटसंबंधी करा हे काम अन्यथा 1 जुलैला शेअर मार्केटमध्ये खरेदी करू शकणार नाही शेअर्स

Onion Oil Benefits | कांद्याच्या तेलाचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, घ्या जाणून

Sarkari Yojna | दर महिना होईल 10,000 रुपयांचे इन्कम, सरकार देते गॅरंटी; आतापासून द्यावे लागतील अवघे 210 रुपये महिना

Narayan Rane | नारायण राणेंची बोचरी टीका, म्हणाले – ‘सेनेला संपवल्याचा राऊतांना आनंद झाला असेल’

Related Posts