IMPIMP

Nitesh Rane | एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर नितेश राणेंचा मुख्यमंत्री ठाकरेंना टोला; म्हणाले – ‘त्यांना ‘शिंदे सेना’ म्हणण्याऐवजी…’

by nagesh
Nitesh Rane | BJP leader nitesh rane says why media is calling it shinde sena it should be uddhav sena

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Nitesh Rane | शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) महाविकास आघाडीतून (Mahavikas Aghadi) बाहेर पडण्यास ठाम असल्याने राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. एकनाथ शिंदे जवळपास 46 ते 47 आमदारांसहीत गुवाहाटीत आहेत. त्यामुळे शिवसेना आणि शिंदेसेना यांच्यात राजकीय संघर्ष उफाळला आहे. या घडामोडीनंतर आता भाजपाचे आमदार नितेश राणेंनी (Nitesh Rane) एकनाथ शिंदेंच्या गटाला शिंदे सेना म्हणणाऱ्या माध्यमांवर आक्षेप घेतला. आपली नाराजी ट्विटरवर व्यक्त करत त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (CM Uddhav Thackeray) टोला लगावला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

शिवसेनेच्या बंडखोर गटाचा उल्लेख अनेक माध्यमांकडून ‘शिंदे सेना’ असा केला जातो आहे. पण यावर नितेश राणेंनी (Nitesh Rane) ट्विटरवरुन आक्षेप घेतला आहे. त्यावेळ नितेश राणे म्हणाले की, “मला आश्चर्य वाटत आहे की प्रसारमाध्यमांमधील मित्र या गटाला शिंदे सेना का म्हणत आहेत? शिवसेना ही माननीय बाळासाहेब ठाकरेंचे निष्ठावंतांची असून ते एकनाथ शिंदेंसोबत आहेत. त्यामुळे ती खरी शिवसेना आहे. याचनुसार दुसऱ्या बाजूला उद्धव सेना म्हटलं पाहिजे,” असं ते म्हणाले.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या गटात जाऊन दाखल होणाऱ्या शिवसेना व अपक्ष आमदारांची संख्या वाढू लागली आहे.
त्यामुळे शिंदे गट अधिक मजबूत होताना दिसत आहे. तर, मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
यांनी वर्षा हे मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान बुधवारी रात्री सोडल्यानंतर तोवर शिवसेनेसोबत असलेले
आणखी 5 आमदार शिंदे गटात सामील झाले. त्यामुळे राज्यात मोठं राजकीय वादळ निर्माण झालं आहे.
सध्या 46 ते 47 आमदार एकनाथ शिंदेंसोबत असल्याने ते सत्तास्थापनेसाठी हालचाली करत असल्याची चर्चा आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Nitesh Rane | BJP leader nitesh rane says why media is calling it shinde sena it should be uddhav sena

हे देखील वाचा :

Pune Traffic Change | संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त पुणे जिल्ह्यातील वाहतुकीत काहीसा बदल; जाणून घ्या

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

Maharashtra Monsoon Update | राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईला यलो Alert

Maharashtra Political Crisis | एकनाथ शिंदे यांनी भाजपचा पाठिंबा असल्याचं केलं मान्य, जाहीर केली ही भूमिका

Related Posts