IMPIMP

Nitesh Rane | ‘जो गाव माझ्या विचारांचा सरपंच देईल, त्या …;’ नीतेश राणेंनी दिली धमकी

by nagesh
Nitesh Rane | nitesh rane more serious allegations against aditya thackeray in the disha salian case

कणकवली : सरकारसत्ता ऑनलाईन   जो गाव माझ्या विचारांचा सरपंच देईल, त्या गावाचा मी विकास करेन. पण, जर का माझ्या विचारांचा सरपंच
आला नाही, तर त्या गावाला मी निधी देणार नाही, विकास करणार नाही, अशी धमकी भाजपा आमदार नीतेश राणे (Nitesh Rane) यांनी ग्रामपंचायत
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिली आहे. कणकवलीत एका प्रचार सभेत नीतेश राणे (Nitesh Rane) यांनी हे विधान केले. त्यामुळे वाद पेटण्याची शक्यता
आहे.

राणे म्हणाले, आता आम्ही सत्तेत असून, सर्व काही आमच्या हातात आहे. चुकूनही जर येथे माझ्या विचारांचा सरपंच आला नाही, तर मी एकही रुपया निधी देणार नाही. आता याला हवे तर धमकी समजा किंवा अन्य काही समजा. पण माझे गणित स्पष्ट आहे. त्यामुळे मतदान करताना हे लक्षात ठेवा, असा इशारा राणे यांनी मतदारांना दिला. सगळा निधी माझ्या हातात आहे. मग तो जिल्हा नियोजन निधी असो, ग्रामविकास निधी असो किंवा केंद्राचा निधी असो. मी सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे. त्यामुळे पालकमंत्री, जिल्हाधिकारी, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री कोणीही मला विचारल्याशिवाय नांदगावमध्ये निधी देणार नाहीत, असेही राणे म्हणाले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे.
त्यावेळी राणे बोलत होते. त्यांच्या या विधानाचा शिवसेनेने पुरेपूर फायदा घेतला आहे.
भाजपला सत्तेचा माज कसा चढला आहे, हे नीतेश राणे यांच्या विधानाने स्पष्ट होते,
असे कुडाळचे शिवसेना आमदार वैभव नाईक म्हणाले. राणे सरळ सरळ मतदारांना धमक्या देत आहेत.
राज्याचे उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, पालकमंत्री माझ्या खिशात आहेत, असे त्यांनी जाहीर सांगितले.

Web Title :- Nitesh Rane | bjp mla nitesh rane threatens voters to not give fund

हे देखील वाचा :

INDW vs AUSW 2nd T20 | स्मृती मंधानाने रचला इतिहास; ही कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय खेळाडू

Shivsena | शिवसेनेच्या मूळ नावावर आणि पक्ष चिन्हावरील दाव्यासाठी निवडणूक आयोगाने घेतला ‘हा’ निर्णय

Aurangabad Crime | नवविवाहित दाम्प्त्याची आत्महत्या; सिल्लोडमधील घटना

Rajinikanth | रजनीकांत यांचा पत्रकार परिषदेत मोठा खुलासा ; म्हणाले “मराठीत काम करण्याची संधी मिळाली होती पण…”

Related Posts