IMPIMP

Nitesh Rane On Sanjay Raut | ‘संजय राऊतांना लवकरच देशमुख, मलिकांसोबत शिवभोजन थाळी खायला पाठवलं पाहिजे’ – भाजप आमदार नितेश राणे

by nagesh
Nitesh Rane On Sanjay Raut | shivsena ubt mp sanjay raut is big land mafia said bjp mla nitesh rane

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Nitesh Rane On Sanjay Raut | शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याशी संबंधित अलिबागमधील मालमत्ता ईडीकडून (ED) जप्त करण्यात आली आहे. संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत (Varsha Raut) यांच्या नावाने अलिबागमध्ये खरेदी करण्यात आलेल्या जमिनीचे एकूण 8 प्लॉट आणि दादरमधील एक फ्लॅटवर ईडीकडून जप्ती करण्यात आली आहे. या कारवाईमुळे राऊत यांना धक्का बसला आहे. यानंतर भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

नितेश राणे म्हणाले की, ”संजय राऊत यांना बाहेर ठेवून उपयोग नाही, त्यांना लवकर घोड्यावर बसवून तुरुंगात पाठवा. ज्याअर्थी ईडीने संजय राऊत यांची संपत्ती जप्त केली म्हणजे तो गुन्हा सिद्ध झाला आहे. त्यामुळे राऊत यांना लवकरात लवकर अटक करावी अशी माझी मागणी आहे. भ्रष्टाचार सिद्ध झाला आहे. तो भ्रष्टाचार संजय राऊत नावाच्या व्यक्तीने केला आहे. पैशाचा गैरवापर केला. त्यामुळे त्यांना बाहेर ठेऊन उपयोग नाही. त्यांना लवकरच अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या बाजूला शिवभोजन थाळी खाण्यासाठी पाठवले पाहिजे,” अशी जोरदार टीका त्यांनी केली आहे. (Nitesh Rane On Sanjay Raut)

ED कारवाईवरुन संजय राऊत काय म्हणाले ?
”2009 साली आमच्या कष्टाच्या पैशातून घेतलेली ही जागा आणि घर आहेत.
त्याची आमच्याकडे साधी चौकशी कुणी केली नाही. विचारणा केली नाही.
2009 ची मालमत्ता आहे. एक एकरही पूर्ण जागा नाही.
आमच्या पत्नीच्या किंवा आमच्या नात्यातील लोकांच्या अधिकृत पैशातून घेतलेल्या त्या जागा आहेत.
ईडीला आता त्याच्यात आर्थिक गैरव्यवहार दिसायला लागलं आहे.
राजकीय सूड कोणत्या थराला जाऊन पोहोचलाय, ते तुम्ही पाहिले असेल.
1 रुपया जरी अशा गैरव्यवहारातला आमच्या खात्यात आला असेल आणि त्यातून आम्ही मालमत्ता खरेदी केली असेल, तरी सर्व मालमत्ता आम्ही भाजपाला दान करेन,” असं संजय राऊत म्हणाले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Nitesh Rane On Sanjay Raut | bjp leader and MLA nitesh rane reaction over ed action on shiv sena sanjay raut property

हे देखील वाचा :

Anil Bonde | भाजपच्या ‘या’ माजी मंत्र्याला तीन महिने कारावासाची शिक्षा, जाणून घ्या!

Shiv Sena MP Sanjay Raut | ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊत आक्रमक ! सोमय्यांना दिली शिवी, भाजपवर हल्ला; पत्रकारांनाही इशारा

Pune Crime | लग्नानंतर अचानक भेटली प्रेयसी अन् बहरलं जुनं प्रेम ! पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर घडलं असं काही की इंजिनियर तरुणानं उचललं टोकाचं पाऊल…

Related Posts