IMPIMP

Nitin Gadkari | ‘जो प्रदेशाध्यक्ष होतो, तो पुढे काय काय होतो, फडणवीस केंद्रात गेल्यावर…’ नितीन गडकरींची आपल्या स्टाईलमध्ये फटकेबाजी (व्हिडिओ)

by nagesh
Nitin Gadkari | will demand resignation of 10 mps including nitin gadkari agitation again for a separate vidarbha

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाइन राज्यात रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) झाल्यानंतर भाजपमध्ये (BJP) खांदेपाटल झाली आहे. मुंबई भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी आशिष शेलार (Ashish Shelar) तर राज्याच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे (State President Chandrasekhar Bawankule) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बावनकुळे प्रदेशाध्यक्ष झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांचा आज नागपूरमध्ये सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी आपल्या स्टाईलमध्ये तुफान फटकेबाजी केली.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

नितीन गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले, आपल्यातला एक कार्यकर्ता आज महाराष्ट्राचं नेतृत्व करत आहे. तुम्हाला माहितच आहे जो प्रदेशाचा अध्यक्ष होतो तो पुढे काय काय होतो. म्हणजे मी मुख्यमंत्रीपदासाठी (CM) शुभेच्छा देत नाहीय बरं, नाहीतर मीडियामध्ये माझ्या नावानं जे मी बोललो नाही ते माझ्या नावावर खपवून देतात. फडणवीसच मुख्यमंत्री झाले पाहिजेत, पण ते केंद्रात गेल्यावर नंतर बावनकुळे तुमचा विचार होऊ शकतो, असं गडकरी मिश्किलपणे म्हणले अन् सभागृहात एकच हशा पिकला.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

गडकरींचे विरोधकांवर टिकास्त्र

बावनकुळेंना येणाऱ्या काळामध्ये पक्षाची सेवा करण्याची संधी आहे. याशिवाय त्यांच्या कतृत्वालाही वाव मिळणार आहे. हा पक्ष कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. पिता-पुत्राचा किंवा आई-मुलाचा पक्ष नसल्याचे सांगत त्यांनी शिवसेना (Shivsena) आणि काँग्रेसला (Congress) टोला लगावला. ते पुढे म्हणाले, एक ऑटोरिक्षा चालवणारा सामान्य माणूस आज महाराष्ट्राचा अध्यक्ष झाला तो आपल्या कर्तृत्वाने आणि कामानं. हे भाजपचं वैशिष्ट्य आहे. एका कार्यकर्त्याचा सन्मान होणं हे माझ्यासहीत देवेंद्र फडणवीसांसहीत सर्व कार्यकर्त्यांसाठी आनंदाचा विषय असल्याचे गडकरी म्हणाले.

महाराष्ट्राचं भविष्य बदलण्याची ताकद भाजपमध्ये

महाराष्ट्राचं भविष्य बदलण्याची ताकद जर कोणत्या पक्षात असेल तर ती ताकद फक्त भाजपमध्येच आहे.
त्यामुळे देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली शासनाचे काम तर होणारच आहे. पण तेवढं संघटन देखील मजबूत झालं पाहिजे.
दोन्ही ताकदीतून पक्षाचा विस्तार आपल्याला करायचा आहे, असं नितीन गडकरी म्हणाले

Web Title : –  Nitin Gadkari | BJP leader and union minister nitin gadkari speech in nagpur about honoring ceremony of chandrashekhar bawankule

हे देखील वाचा :

Bank Holidays | आजपासून महिनाभरात 8 दिवस बंद राहतील बँका, घरबसल्याच उरकून घेऊ शकता महत्वाची कामे; पहा पद्धत

Pune Crime | अल्पवयीन मुलाच्या मदतीने वाहन चोरी करणारा चोरटा गुन्हे शाखेकडून गजाआड, 5 वाहने जप्त

Karlyache Fayde | आजारांनी तुम्हाला त्रस्त केलेय का? सुरू करा कारल्याचे सेवन, मग पहा; होईल चमत्कार

Related Posts