IMPIMP

Nitin Gadkari | ‘… राजकारण सोडावंसं वाटतं’; नितीन गडकरींच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीच्या नेत्याची प्रतिक्रिया, म्हणाले…

by nagesh
Nitin Gadkari Threat Case | the mystery of the nitin gadkari threat case has increased that girl in hospital

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन महात्मा गांधींपासून (Mahatma Gandhi) ज्या राजकीय परंपरेने कार्य झाले त्यात राजकारण (Politics) हे समाजकारण, राष्ट्रीयकारण, विकासकारण होते. पण आता 100 टक्के सत्ताकारण झाले आहे. मला खूप वेळा राजकारण सोडावे वाटते, असे वक्तव्य भाजपा नेते (BJP Leader) आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केले होते. या वक्तव्याचे विविध अर्थ लावले जात असून राजकारणात आणि समाज माध्यमांवर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड (NCP Leader MLA Jitendra Awhad) यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आव्हाड यांनी म्हटले की, नितीन गडकरी (Nitin Gadkari) म्हणत आहेत ते खरे आहे. राजकारण फक्त सत्तेसाठी करायचे नसते.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

जितेंद्र आव्हाड म्हणाले, नितीन गडकरींनी (Nitin Gadkari) त्यांच्या भाषणात राजकारण्यांचा व राजकारणाचा कंटाळा यायला लागला आहे. आता फक्त सत्ताकारणाचे राजकारण होत आहे, असे म्हटले आहे. ते म्हणाले ते बरोबर आहे. सत्ता ही लोकशाही, कल्याणकारी राज्याचा मार्ग दाखवते. त्यात लोककल्याणाची भाषा असावी. राजकारण फक्त सत्तेसाठी करायचे नसते.

गरिबांचे अश्रू पुसणे, मदत हवी तिथे आधारासाठी जाणे. गोरगरीब शोषितांच्या मदतीला धावून जाणे. हाच राजकारणाचा खरा अर्थ आहे. सत्ता दुय्यम आहे. मनात मदतीची भावना असावी. कुठल्या भागातून कुणाला कुठली मते मिळतात हा प्रश्न गौण ठरतो.

कुठलाही भाग असो तेथील नागरिकांना मदत झाली पाहिजे. शाळेचा किंवा कॉलेजचा प्रश्न असतो, दाखल्याचा, उत्पनाच्या दाखल्याचा प्रश्न असतो. तहसीलदार कार्यालयात नागरिकांचे दोन-दोन तास वाया जातात. त्यापेक्षा या सगळ्या प्रश्नांची उत्तरे एका ठिकाणी मिळाली, तर नागरिकांना काही तासात दाखले मिळतील. ही चांगली जनसेवा असल्याचे मला वाटते, असे आव्हाड म्हणाले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

नितीन गडकरी काय म्हणाले होते ?

राजकारण या शब्दाचा अर्थ समजून घेण्याची वेळ आली आहे. राजकारण हे समाजकारण आहे ? राष्ट्रकारण आहे ? विकास कारण आहे ? की सत्ताकारण आहे ? हे समजून घेतले पाहिजे.

मला खूप वेळा राजकारण सोडावे वाटते, कारण आयुष्यात राजकारण सोडता अनेक गोष्टी करण्यासारख्या आहेत.

महात्मा गांधींपासून ज्या राजकीय परंपरेने कार्य झाले त्यात राजकारण हे समाजकारण, राष्ट्रीयकारण, विकासकारण होते. पण आता 100 टक्के सत्ताकारण झाले आहे.

सामाजिक आणि राजकीय जीवन समृद्ध व्हावे, त्यात दर्जात्मक बदल व्हावेत यासाठी व्यक्ती आणि नेतृत्वात गुणात्मक बदल झाला पाहिजे.
गुणात्मक परिवर्तन ही एक प्रक्रिया आहे.

विचारांमधून, थोर पुरुषांपासून आपल्याला प्रेरणा मिळत असते. सगळ्या विश्वाचे कल्याण व्हावे, अशी आपली संस्कृती आहे.
माझे कल्याण व्हावे असे आपल्या संस्कृतीत लिहिलेले नाही.

माणसाच्या मोठेपणाचा, कर्तृत्वाचा आणि गुणवत्तेचा त्याच्या निवडून येण्याच्या गुणवत्तेशी काही संबंध नाही.
जो निवडून येतो तोच सिकंदर अशी आपल्या समाजात भावना आहे.

निवडून येणार्‍या लोकांबद्दल मला फार काही बोलायचे नाही. वेगवेगळ्या प्रकारचे लोक निवडून येत असतात.

राजकारण आणि क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकते.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Nitin Gadkari | ncp leader jitendra awhad comment on bjp leader and union minister nitin gadkari statement on politics

हे देखील वाचा :

CM Eknath Shinde | ‘…नाहीतर आमचाच ‘कार्यक्रम’ झाला असता’, CM एकनाथ शिंदे यांनी सांगितलं

UP Gang Rape Case | सामूहिक बलात्कार प्रकरण ! माजी आमदाराच्या मुलाला पुण्यातील उच्चभ्रू सोसायटीतून अटक

Maharashtra Political Crisis | शिवसेनेला मोठा धक्का ! जिल्हाप्रमुखच शिंदे गटात ?, 25 पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्ते देखील

Related Posts