IMPIMP

Nitish Kumar On Loksabh Election 2024 | 2024 च्या लोकसभा निवडणूकीमध्ये पंतप्रधान पदाचे उमेदवार बनणार ? नितीश कुमार यांचं विधान, म्हणाले…

by nagesh
Nitish Kumar On Loksabh Election 2024 | to become a candidate for the post of prime minister in 2024 nitish kumars big statement after swearing in said

पाटणा : वृत्तसंस्था – Nitish Kumar On Loksabh Election 2024 | बिहारमध्ये राजकीय भूकंप घडवून भाजपाला (BJP) मोठा धक्का देणार्‍या नितीशकुमार यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर एक सूचक विधान करत भाजपाला जोरदार धक्का दिला आहे. बिहारमध्ये नितीशकुमार यांनी राजकीय नाट्य घडवून अचानक भाजपाला सत्तेतून बाहेर फेकले. लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांच्या आरजेडीसोबत पुन्हा एकदा महाआघाडी करत नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. (Nitish Kumar On Loksabh Election 2024)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर नितीश कुमार भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा (BJP President J.P. Nadda) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर पलटवार करत म्हटले की, भाजपाला वाटले होते की, विरोधी पक्ष संपुष्टात येईल. मात्र आता आम्हीही विरोधी पक्षामध्ये आहोत.

नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव न घेता म्हटले की, 2024 मध्ये येणारे 2024 मध्ये राहतील तेव्हा ना.
आम्ही राहू अथवा न राहू. पण 2024 मध्ये ते राहणार नाहीत. मी विरोधी पक्षांना 2024 मध्ये एकजूट होण्याचे आवाहन करतो.
दरम्यान, पंतप्रधानपदाच्या उमेदवारीबाबत विचारले असता नितीश कुमार यांनी म्हटले की, मी पंतप्रधानपदासाठी उमेदवार नाही. (Nitish Kumar On Loksabh Election 2024 )

9 वर्षांत नितीश कुमार यांनी दोन वेळा भाजपासोबत सत्ता स्थापन केली आहे.
2013 मध्ये भाजपाने पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून निवड झाल्यानंतर त्याला विरोध करत नितीश कुमार यांनी भाजपासोबत आघाडी मोडली होती.

2015 मध्ये विधानसभा निवडणुकीत लालूंच्या आरजेडीसोबत महाआघाडी करत नितीश कुमार यांनी भाजपाचा दारुण पराभव केला होता.
2017 मध्ये नितीश कुमार हे महाआघाडीची साथ सोडून पुन्हा भाजपासोबत एनडीएमध्ये आले होते.
त्यानंतर बिहार विधानसभेच्या निवडणुकीत (Bihar Assembly Elections) नितीश कुमार यांनी भाजपासोबत आघाडी करून विजय मिळवला होता.
आता नितीश कुमार यांनी पुन्हा आरजेडीसोबत जवळीक करत आठव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title : –  Nitish Kumar On Loksabh Election 2024 | to become a candidate for the post of prime minister in 2024 nitish kumars big statement after swearing in said

हे देखील वाचा :

MNS Leader Shalini Thackeray | ‘महिलांचे अस्तित्वच सरकारला अमान्य’ – मनसे नेत्या शालिनी ठाकरे

NCP Chief Sharad Pawar | धनुष्यबाण चिन्हाबाबत शरद पवारांचा शिंदेंना महत्त्वाचा सल्ला, म्हणाले…

Kishori Pednekar | ‘मंत्रिपदाची शपथ घेताना बाळासाहेबांची आठवण झाली नाही’ – किशोरी पेडणेकर

Related Posts