IMPIMP

No Toll Plaza on Highway | विना टोल प्लाझा हाय-वेवर चालवू शकता गाडी, सरकार आणत आहे ही नवीन System

by nagesh
No Toll Plaza on Highway | no toll plaza on national highway government is bringing anpr system much better than fastag

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाNo Toll Plaza on Highway | तुम्ही कोणत्याही महामार्गावर गेल्यावर टोलनाक्यांवर लांबच लांब रांगांचा सामना करावा लागतो. मात्र त्यातून सुटका करून घेण्यासाठी Fastag आणण्यात आले. मात्र, असे असतानाही टोलनाक्यावरील लांबलचक रांगांमध्ये कोणताही फरक पडलेला नाही. दरम्यान, आता अधिक हायटेक होण्याची वेळ आली आहे. त्यासाठी आता ANPR (ऑटोमॅटिक नंबर प्लेट रीडर) सिस्टम लागू होणार आहे. (No Toll Plaza on Highway)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

लोकांना होईल हा फायदा

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालय एक नवीन संकल्पना घेऊन येत आहे. या अंतर्गत, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) राजस्थानमध्ये असा ग्रीन फील्ड एक्सप्रेस वे बनवत आहे, जिथे एकही टोल बूथ नसेल. याचा सर्वात मोठा फायदा हा होणार आहे की, वाहन मालकाला तेवढीच रक्कम द्यावी लागेल जेवढी त्याने महामार्गावरून (National Highway) गाडी चालवली आहे.

आता नंबर प्लेटचे होईल स्कॅनिंग

सध्या महामार्गावरून प्रवास करताना वाहनांवर लावलेल्या फास्टॅगमधून पैसे कापले जातात. पण नवीन तंत्रज्ञान लागू झाल्यानंतर तुमच्या वाहनाची नंबर प्लेट स्कॅन केली जाईल आणि फास्टॅगमधून पैसे कापले जातील. यामध्ये किलोमीटरच्या आधारे लोकांना पैसे मोजावे लागणार असल्याचे समजते. (No Toll Plaza on Highway)

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या टोलवर एकाच वेळी पैसे वसूल केले जातात. मात्र नवीन प्रणालीमध्ये तुम्ही हायवेवर जेवढी गाडी चालवाल तेवढेच पैसे द्यावे लागतील. या सिस्टममध्ये महामार्गावर एकच एंट्री आणि एक्झिट पॉइंट असेल. वाहन दाखल होताच नंबर प्लेट स्कॅन केली जाईल. त्यानंतर प्रवेश मिळेल आणि बाहेर पडण्याच्या अंतरानुसार प्रवाशांच्या खात्यातून पैसे कापले जातील.

राजस्थानपासून होईल सुरुवात

याची सुरुवात राजस्थानपासून होत आहे. भारत माला प्रकल्पांतर्गत राजस्थानमध्ये ग्रीन फील्ड एक्सप्रेस वे बनवला जात आहे.
माहितीनुसार, राजस्थानमध्ये त्याची एकूण लांबी 637 किमी असेल.
हा एक्सप्रेस वे पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि गुजरातमधून जाणार आहे.

त्याची लांबी 1224 किमी असेल. हा ग्रीन फील्ड एक्सप्रेस वे पंजाबमधील अमृतसरमधून सुरू होऊन गुजरातमधील जामनगरपर्यंत जाईल.
तो राजस्थानातील दोन शहरांना जोडेल. या एनएचवरून अरबी समुद्रातील बंदरापर्यंत कनेक्टिव्हिटी मिळेल.
हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर राजस्थानला एक डेडिकेटेड एक्सप्रेस वे मिळेल. या मार्गावर प्रवाशांना कमी वळणे मिळतील.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- No Toll Plaza on Highway | no toll plaza on national highway government is bringing anpr system much better than fastag

हे देखील वाचा :

Maharashtra Political Crisis | देवेंद्र फडणवीसांचा फोटो शेअर करत भाजप नेत्याचं सूचक ट्विट; म्हणाले – ‘मी पुन्हा येईन…’

Blinkit सोबतच्या डीलनंतर Zomato च्या शेअरची स्थिती बिकट, 9 टक्केपेक्षा जास्त घसरून येथे पोहचला भाव

Maharashtra Political Crisis | 8 कॅबिनेट मंत्री – 5 राज्यमंत्री; एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री ! भाजपासोबत ‘या’ फॉर्म्युलावर सरकार बनवण्याची तयारी

Related Posts