IMPIMP

OBC Political Reservation Maharashtra | चंद्रकांत पाटील आक्रमक; म्हणाले – ‘तुम्ही दिल्लीत जा नाही तर मसणात जा, पण…’

by Team Deccan Express
OBC Political Reservation Maharashtra | bjp chandrakant patil aggressive for obc reservation aggiation on mantralaya

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन OBC Political Reservation Maharashtra | सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) महाराष्ट्र ओबीसींचे राजकीय आरक्षण (OBC Political Reservation Maharashtra) नाकारलं आहे. आगामी स्थानिक शासन संस्थेच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्याचे निर्देश दिले आहे. या पार्श्वभूमीवर आता भाजप (BJP) आक्रमक झाला आहे. आज भाजपचे ओबीसी सेलचे प्रमुख योगेश टिळेकर (Yogesh Tilekar) यांच्या नेतृत्त्वात मंत्रालयावर भाजपचा मोर्चा काढण्यात आला. दरम्यान यापुर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

दरम्यान यावेळी चंद्रकांत पाटील आक्रमक होतं थेट महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi Government) हल्लाबोल करत आहे. मध्य प्रदेशच्या सरकारने दोन दिवसांमध्ये दिल्लीत असं काय केलं ज्यामुळे मध्य प्रदेशात आरक्षण मिळाले, असं विधान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी केलं होतं. मात्र, त्यावर चंद्रकांत पाटील यांनी जोरदार निशाणा साधला आहे. (OBC Political Reservation Maharashtra)

”घरी जा, स्वयंपाक करा असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.” पुढे ते म्हणाले, ”मसणात जा, दिल्लीत जा कुठेही जा पण आरक्षण द्या, असं म्हणत चंद्रकांत पाटील चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसले. दरम्यान, आजच्या या आंदोलनात मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते, आंदोलक राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ओबीसी राजकीय आरक्षण जाण्याला महाविकास आघाडी सरकारच जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आले. ओबीसींचं राजकीय आरक्षण गेल्यामुळे भाजपच्या ओबीसी मोर्चाने आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Web Title :- OBC Political Reservation Maharashtra | bjp chandrakant patil aggressive for obc reservation aggiation on mantralaya

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

हे देखील वाचा :

Related Posts