IMPIMP

OBC Reservation Maharashtra | राज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय ! OBC संवर्गातील 400 जागांवरील निवडणुका स्थगित

by nagesh
OBC Reservation Maharashtra | Maharashtra election commission has decided to stay the election for 400 obc seats in local bodies Election Commissioner UPS Madan

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइनसर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) ओबीसी आरक्षणाला (OBC Reservation Maharashtra) स्थगिती देण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाने (Maharashtra Election Commission) मोठे पाऊल उचलत ओबीसी संवर्गातील (OBC Reservation Maharashtra) जागांवर होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकीला स्थगिती (Election postponed) दिली आहे. राज्यातील 106 नगरपंचायतींमध्ये एकूण 1 हजार 802 जगांसाठी निवडणूक होणार होती. या एकूण जागांपैकी ओबीसींच्या 400 जागांवरील निवडणुकीला स्थगिती मिळाली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

राज्य सरकारने (Maharashtra Government) एक अध्यादेश काढत ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाची पुनर्स्थापना केली होती. मात्र, हा अध्यादेश सर्वोच्च न्यायालयात टिकू शकला नाही. या अध्यादेशाला सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) स्थगिती दिल्याने राज्य सरकारला मोठा झटका बसला आहे. ओबीसींना आरक्षण (OBC Reservation Maharashtra) देण्यासाठी राज्य सरकारला ओबीसी समाजाची आरक्षणासाठीची लोकसंख्येची आकडेवारी गोळा करावी लागणार आहे. ही आकडेवारी एखाद्या आयोगामार्फत करावी लागणार आहे. तसे झाल्यानंतर ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाब निर्णय घेतला जाईल, असे सर्वोच्च न्यायालायने म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या 6 डिसेंबरच्या आदेशानंतर आता सर्व स्थानिक स्वराज्य संस्थामधील नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागांवरील निवडणुका आहे त्या टप्प्यावर स्थगित करण्यात आल्या आहेत.
मात्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि सर्वसाधारण जागांसाठीची निवडणूक पूर्व घोषित कार्यक्रमानुसार पुढे सुरु राहील.
नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग जागांच्या स्थगित निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील आदेशानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल
असे निवडणूक आयुक्त यूपीएस मदान (Election Commissioner UPS Madan) यांनी सांगितले.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा

भंडारा व गोंदिया जिल्हा परिषद- 23 (एकूण जागा 105)

भंडारा व गोंदियातील 15 पंचायत समित्या- 45 (एकूण जागा 210)

राज्यातील 106 नगरपंचायती- 344 (एकूण जागा 1,802)

महानगरपालिका पोटनिवडणुका- 1 (एकूण 4 जागा)

Web Title :- OBC Reservation Maharashtra | Maharashtra election commission has decided to stay the election for 400 obc seats in local bodies Election Commissioner UPS Madan

हे देखील वाचा :

Sara Tendulkar | सारा सचिन तेंडुलकरचं मॉडेलिंग क्षेत्रात पाऊल (व्हिडीओ)

Covid Jab | बिहारमध्ये PM मोदी-सोनिया-प्रियंकाने घेतला कोरोनाचा डोस! आरोग्य विभागाचा अजब खेळ

Multibagger Penny Stock | रू. 19 चा स्टॉक वाढून रू. 494 चा झाला, 6 महिन्यात गुंतवणुकदार झाले मालामाल; तुमच्याकडे आहे का

Related Posts