IMPIMP

OBC Reservation Maharashtra | सुप्रीम कोर्टाच्या धक्क्यानंतर ठाकरे सरकारनं घेतला मोठा निर्णय

by nagesh
Shivsena | big relief to shivsena chief uddhav thackeray from supreme court about election commissions notice

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणासंदर्भात (OBC Reservation Maharashtra) राज्य सरकारची याचिका सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) फेटाळल्याने ठाकरे सरकारला (Thackeray Government) हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. यानंतर आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत (cabinet meeting) ओबीसींच्या राजकीय आरक्षण (OBC Reservation Maharashtra) आणि निवडणुका घेण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. या बैठकीत ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत निवडणुका (Election) होऊ नयेत यासाठी निवडणूक आयोगाला विनंती करण्याचा महत्त्वाचा निर्णय झाला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली. आज ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत मंत्रिमंडळात चर्चा झाली. यावेळी मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी आपापली मते मांडली. ओबीसींच्या आरक्षणाचा (OBC Reservation Maharashtra) मार्ग जो पर्यंत मोकळा होत नाही. तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local body election) घेऊ नयेत, ओबीसींशिवाय निवडणुका होऊच नयेत, असे मत सर्व मंत्र्यांनी मांडले, असे छगन भुजबळ यांनी सांगितले.

निवडणूक आयोगला विनंती करणार

राज्य सरकार आता लवकरच ओबीसींचा डेटा (OBC data) गोळा करणार आहे. हा डेटा गोळा होईपर्यंत निवडणुका घेऊ नयेत अशी विनंती राज्य निवडणूक आयोगाला (State Election Commission) करावी असा ठराव आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाला.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

आयोगाला अर्थ सहाय्य करणे आवश्यक

ओबीसींचे राजकीय आरक्षण अबाधित राखण्यासाठी ओबीसींचा इम्पिरिकल डेटा (Imperial data) गोळा होणे गरजेचे आहे.
हे काम करणाऱ्या आयोगाला अर्थ सहाय्य करणे अत्यंत गरजेचं असून
आवश्यक ती रक्कम मंजूर करण्याचा निर्णय येत्या विधिमंडळ अधिवेशनात घेतला जाईल, असेही भुजबळ यांनी दिली.

Web Title :- OBC Reservation Maharashtra | Maharashtra Thackeray cabinet today decided-to request the election commission not to hold elections till the obc data is collected

हे देखील वाचा :

PM Kisan चा 10 वा हप्ता येणार आहे खात्यात, परंतु अगोदर तपासा आपले KYC; जाणून घ्या

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 47 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Nana Patekar On Thackeray Government | सुप्रसिध्द अभिनेते नाना पाटेकरांची ठाकरे सरकारवर टीका, म्हणाले – ‘…उध्दवा अजब तुझे सरकार’

Related Posts