IMPIMP

Old Pension Scheme-NPS | ओल्ड पेन्शन तर पुन्हा येणार नाही, पण NPS मध्ये होणारे बदल करतील खुश, सरकारन घेतंय निर्णय

by sachinsitapure

नवी दिल्ली : Old Pension Scheme-NPS | केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शनबाबत लवकरच खुशखबर मिळू शकते. राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS) अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्यांनी घेतलेल्या अंतिम वेतनाच्या ५० टक्के पेन्शन म्हणून देण्यावर सरकार गांभिर्याने विचार करत आहे. पेन्शन असमानतेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये सरकारविरूद्ध असलेला असंतोष पाहता आता सरकार अंतिम वेतनाच्या अध्र्या भागाइतकी पेन्शन गॅरंटी देऊ शकते.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यापूर्वी या योजनेच्या व्यवहारिकतेचा शोध घेण्यासाठी अर्थ सचिव टी. व्ही. सोमनाथन यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीचे गठन करण्याची घोषणा केली आहे.

मात्र, हे जवळपास स्पष्ट आहे की सरकार जुनी पेन्शन योजना (OPS) पुन्हा लागू करणार नाही. परंतु सरकार कर्मचाऱ्यांना चांगली सुरक्षा प्रदान करण्यासाठी राष्ट्रीय पेन्शन प्रणालीत आवश्य करू शकते. सर्व विरोधी पक्ष जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी सरकारकडे करत आहेत आणि आश्वासन सुद्धा देत आहेत की, ते सत्तेत आल्यानंतर जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करतील.

जुन्या पेन्शन योजनेत, कर्मचाऱ्यांना वेतन आयोगाच्या शिफारशींसह त्यांच्या समायोजित अंतिम वेतनाच्या निम्मी रक्कम आयुष्यभर पेन्शन म्हणून मिळते. या उलट, एनपीएस एक अंशदान-आधारित योजना आहे, ज्यामध्ये कर्मचारी आपल्या मुळ वेतनाच्या १० टक्के योगदान जमा करतात आणि सरकार त्यामध्ये १४ टक्के टाकते.

Related Posts