IMPIMP

मर्डर केसमध्ये ऑलिम्पिक मेडल विजेता सुशील कुमारचे नाव आले समोर, पोलिसांकडून कुस्तीपटूच्या घरावर छापा

by nagesh
olympic medal winner sushil kumar name surfaced in murder case

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियममध्ये मागच्या मंगळवारी कुस्तीपटूंच्या दोन गटात हाणामारी झाली होती, ज्यामध्ये एका 23 वर्षांच्या कुस्तीपटूचा मृत्यू झाला. घटनेत ऑलिम्पिक मेडल विजेता कुस्तीपटू सुशील कुमारचे (Sushil Kumar) सुद्धा नाव समोर आले आहे, ज्यानंतर आता दिल्ली पोलिसांच्या टीमने त्याच्या घरावर छापा मारला आहे.

Maratha Reservation : मुख्यमंत्र्यांनी केंद्राला करुन दिली ‘त्या’ कलमांची आठवण, तत्परतेने निर्णय घेण्याची मागणी

या संपूर्ण प्रकरणात दिल्ली पोलिसांनी सुशील कुमारसह Sushil Kumar दोन कुस्तीपटूंच्या घरावर छापा टाकला आहे. पोलिसांनुसार, टीम सुशील कुमारच्या घरी पोहचली होती परंतु तो घरी नव्हता. ज्यानंतर आता अनेक टीम गठित करण्यात आल्या असून त्याचा शोध सुरू करण्यात आला आहे. तसेच, पोलिसांनी सांगितले की, आम्ही हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत की, प्रकरणात सुशील कुमारचा नेमका कोणत्या प्रकारचा सहभाग आहे.

‘खडसेंचं मानसिक संतुलन बिघडलंय’, ‘त्या’ ऑडिओ क्लिपवरुन गिरीश महाजनांचा शेलक्या शब्दांत खडसेंना टोला

उपचारादरम्यान 23 वर्षीय कुस्तपटूचा मृत्यू
दिल्ली पोलिसांना मागच्या मंगळवारी दुपारी सुमारे 12 वाजता छत्रसाल स्टेडियममध्ये कुस्तीपटूंमध्ये हाणामारी झाल्याची माहिती मिळाली होती. हाणामारीत जखमी झालेल्या कुस्तीपटूला बीजेआरएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले ज्यानंतर प्रकृती खालवल्याने त्यास ट्रॉमा सेंटल येथे हलवण्यात आले, जिथे बुधवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. मृताचे नाव सागर कुमार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

…अन् आता निवडणुका संपल्यावर दिल्लीत येऊन कोरोना निवारणाच्या देवपूजेला लागले?

प्रकरणाचा तपास सुरू
पोलिसांनी सांगितले की, सागरला अतिशय जबर मारहाण करण्यात आली होती, यामुळे त्याचा मृत्यू झाला. सोबतच त्याच्या दोन मित्रांना सुद्धा स्टेडियमच्या बाहेर मारहाण करण्यात आली. आता संपूर्ण प्रकरणात ऑलिम्पिक मेडलिस्ट कुस्तीपटू सुशील कुमारची Sushil Kumar भूमिका कोणती होती याचा शोध पोलीस घेत आहेत. पोलिसांनी सांगितले की, आता यापूर्ण प्रकरणात दोन लोकांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

Also Read :

Devendra Fadanvis : …म्हणून महाराष्ट्रात सर्वात जास्त लसीकरण

Chandrakant Patil : ‘ही पोटनिवडणूक म्हणजे एक लिटमस टेस्ट; मुख्यमंत्री ठाकरे सरकार चालवू शकत नाहीत’

Related Posts

Leave a Comment