IMPIMP

Omicron Covid Variant | अत्यंत चिंताजनक ! मुंबई, पुण्यात ओमिक्रॉनचा समूह संसर्ग, धोका वाढल्यानं काळजी घेणं गरजेचं

by nagesh
Omicron Covid Variant | omicron gradually spreading in community maharashtra mumbai pune corona omicron update community spread third wave

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनदेशात ओमायक्रॉनचा (Omicron Covid Variant) धोका वाढत आहे. देशातील 22 राज्यांमध्ये ओमिक्रॉनचा फैलाव झाला आहे. महाराष्ट्रात देखील ओमिक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण आढळून येत आहेत. राज्यात मुंबई आणि पुण्यात कोरोनाच्या (Pune Corona) ओमिक्रॉन व्हेरियंटचा (Omicron Covid Variant) प्रादुर्भाव वाढत असल्याचे चित्र आहे. दररोज मोठ्या प्रमाणावर याचे रुग्ण आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई (Mumbai) आणि पुण्यात ओमिक्रॉनच्या समूह संसर्गाला (Community Spread) सुरुवात झाल्याचा दावा, आयसर या संस्थेच्या (Eicher Institute) हवाल्याने राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे (Dr. Pradeep Awate) यांनी केला आहे. (community transmission of omicron covid variant confirmed in mumbai and pune)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

डॉ. आवटे यांनी म्हटलं आहे की, या रुग्णांचा आंतरराष्ट्रीय प्रवासाचा इतिहास नाही. समाजात ओमिक्रॉनचा संसर्ग दिसत आहे. चांगली गोष्ट अशी आहे की, ओमिक्रॉनचा संसर्ग (Omicron Covid Variant) असलेल्या रुग्णांमध्ये सौम्य स्वरुपाची आहेत. लक्षणंविरहित रुग्ण अधिक आहेत. मृत्यूचं प्रमाण देखील कमी आहे. परंतु आपण कोविडच्या (Covid-19) पार्श्वभूमीवर अधिक काळजी घेण्याची गरज आहे, नियमांचे काटेकोर पालन करण्याची गरज आहे, असं आवाहन देखील डॉ. प्रदीप आवटे यांनी केले आहे.

पुण्यातील आयसर या संस्थेनं राज्यातील वाढत्या ओमिक्रॉन संसर्गाचं सर्वेक्षण केलं. यामध्ये 38 नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यामध्ये मुंबई आणि पुण्यात सामुहिक संसर्गाचं प्राथमिक निदान करण्यात आलं. ओमिक्रॉनचा संसर्ग वेगाने होत असला तरी रुग्णांना ऑक्सिजन (Oxygen) किंवा व्हेंटिलेटरची (Ventilator) गरज नसल्याचं आवटे यांनी सांगितले. तरीही काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे आवाहन त्यांनी केलं आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Omicron Covid Variant | omicron gradually spreading in community maharashtra mumbai pune corona omicron update community spread third wave

हे देखील वाचा :

Wardha Crime | प्रेमाच्या प्रकरणात जेरबंद ! बाहेर आल्यावर उदरनिर्वाहासाठी टाकली टपरी, अन् संपवलं जीवन

Ratan Tata | रतन टाटांना वाढदिवसाचा केक भरवणारा ‘तो’ तरुण कोण? त्याचा पुण्याशी काय संबंध? जाणून घ्या (व्हिडिओ)

Kirit Somaiya | विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन सोमय्यांचा खळबळजनक दावा; म्हणाले – ‘पवार आणि ठाकरेंनी राहुल गांधींचं पपलू केलं’

Related Posts