IMPIMP

Omicron Variant | ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरु करण्याच्या निर्णयावर आज फेरविचार?

by nagesh
Pune PMC News | All Municipal and Private Schools within the limits of Pune Municipal Corporation will start regular from tomorrow

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे (Omicron Variant) राज्यात अनेक निर्बंध लागू केले आहेत. कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस (Corona Vaccination) घेतलेल्यांना प्रवासासाठी मुभा देण्यात आली आहे. त्यातच आता १ डिसेंबरपासून राज्यातील शाळा सुरु होणार आहेत. मात्र या नव्या व्हेरियंटमुळे (Omicron Variant) मुलांना शाळेत पाठवायचे कि नाही याबाबत पालकांच्या म्हणतात साशंकता निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभाग आणि आरोग्य विभागाची बैठक आज होणार आहेत. यामध्ये राज्यातील शाळा १ डिसेंबरपासून सुरु करायच्या की नाही यावर अंतिम निर्णय होणार आहे. मात्र तत्पूर्वीच आरोग्य विभागाच्या आरोग्यसेवा संचालनालयाकडून शाळा सुरू करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

आरोग्यसेवा संचालनालयाने जारी केलेल्या सुचना जिल्हापरिषद, महापालिका, नगरपालिका स्तरावर देण्यात आल्या आहेत. यात दोन विद्यार्थ्यांमध्ये सहा फूट अंतर, शाळेत मास्क घालणे बंधनकारक, वैयक्तिक आणि शाळेत स्वच्छता, शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झालेले असावे, बायोमेट्रिक पद्धतीचा अवलंब करू नये, शाळेत गर्दी होणार नाही असे उपक्रम, खेळ किंवा सामूहिक प्रार्थना टाळाव्यात. ज्यांना कोणतीही लक्षणे नाहीत अशाच व्यक्तींना शाळेच्या आवारात किंवा वर्गात येण्यास अनुमती असावी असे स्पष्ट करण्यात आले आहे. (Omicron Variant)

त्याचबरोबर क्वारंटाईन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाइन शिक्षणाची सोय उपलब्ध व्हावी. तसेच दोन आठवड्याच्या कालावधीत शाळेतील एकाच वर्गात पाच पेक्षा अधिक मुले कोरोना बाधित आढळल्यास शाळेतील कोविड प्रतिबंधक कृती योजनेचा आढावा घ्यावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय मुलांच्या व शिक्षकांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊन नैराश्य, तणाव निर्माण होऊ शकतो यासाठी समुपदेशनाची व्यवस्था करण्याचे आदेशही शाळांना देण्यात आले आहेत.

Web Title :- Omicron Variant | coronavirus Omicron Variant will there be rethink about starting school maharashtra

हे देखील वाचा :

Parambir Singh | परमबीर सिंह यांना मोठा दिलासा; पण, सुनावला दंड

LIC New Jeevan Anand | ‘एलआयसी’ची ‘ही’ पॉलिसी खुप कामाची ! विना प्रीमियम मिळते 10 लाखाचे कव्हर आणि दरवर्षी बोनस

Crude Oil Prices | कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉनचा प्रभाव, LPG सिलेंडरपासून पेट्रोल-डिझेलपर्यंत होऊ शकते स्वस्त

Related Posts