IMPIMP

Paduka Darshan ceremony | लहू बालवडकर सोशल वेलफेअरच्या पुढाकारानं भारतातील 12 शक्तिपीठांच्या पादुका दर्शनाचा सोहळा

by nagesh
Paduka Darshan Ceremony | paduka darshan ceremony of 12 shakti peeths in india lahu balwadkar social welfare initiative balewadi area

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  Paduka Darshan ceremony | भारतातील बारा शक्तिपीठांच्या पादुका दर्शनाचा (Paduka Darshan ceremony) अभूतपुर्व सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याचे आयोजन लहू बालवडकर सोशल वेलफेअरच्या मार्फत करण्यात आले. भाजप सदस्य लहू बालवडकर (Lahu Balwadkar) यांच्या पुढाकाराने पुण्यातील बालेवाडी (Balewadi) येथील गेनबा सोपानराव मोझे कॉलेजच्या मैदानात भक्तांसाठी पादुका दर्शनाचा कार्यक्रम घेतला आहे. शुक्रवारी (19 नोव्हेंबर) रोजी या कार्यक्रमाचे आयोजन केलं आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

या आयोजित केलेल्या अभूतपुर्व सोहळ्यामध्ये (Paduka Darshan ceremony) प्राचिन श्री दत्ता सुवर्ण मूर्ती,
श्री सायंदेव दत्तश्रेत्र कडगंची येथील श्री दत्त गुरू करुणा पादुका, श्री क्षेत्र औदुंबर येथिल श्री नृसिंह सरस्वती नारायण पादुका,
श्री गुरू हैबतराव बाब यांनी नेर्लेकर घराण्याला दिलेल्या श्री ज्ञानेश्वर महाराज पादुका, श्री साई बाबा यांनी सन 1898 साली निमोणकर घराण्याला दिलेल्या श्री साई बाबा पादुका,
परम स्वामी भक्त श्रीमती सुंदराबाई काडगावकर यांना महाराजांनी सन 1866 साली
दिलेल्या श्री स्वामी समर्थ महाराज पादुका, कै. भगवानराव जानराव देशमुख यांना श्री गजानन महाराज यांनी सन 1907 साली दिलेल्या श्री गजानन महाराज पादुका,

श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गड सावरगाव बीड येथील संजीवनी समाधी श्री मच्छिंद्रनात महाराज पादुका, समर्थ भक्त मोहन बुवा रामदासी,
खादगाव यांचे घराण्यातील श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या प्रासादिक श्री समर्थ रामदास स्वामी पादुका, श्रीमद वासुदेवानंद सरस्वती (टेंबे)
स्वामी महाराज श्री परमहंस परिव्राजताचार्य पादुका, प.पु. रधुनाथ हरिभाऊ कडलासकर (पेंटर काक) यांना सन 1946 साली शंकर महाराजांनी
दिलेल्या प्रासादिक श्री शंकर महाराज पादुका आणि संस्थापक आचार्य आंतरराष्टीय कृष्णभवनामृत संघ भक्तिवेदांत स्वामी
प्रभुपाद कृष्णकृपामूर्ती श्री श्रीमद ए. सी. पादुका या 12 पादुकांचा समावेश केला गेला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

लहू बालवडकर (Lahu Balwadkar) म्हणाले, शुक्रवारी आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम कोविड काळानंतर प्रथमच आपल्या
व आपल्या परिवारासाठी योग्य आला आहे.
विशेषत ज्या वृद्ध लोकांना येवढ्या लांब जाऊन दर्शन करता येत नाही त्याच्यासाठी आयोजित करण्यात आला असून जास्तीत जास्त
भाविकांनी भक्ती-भावाने दर्शनाचा लाभ घ्यावा.
असं आवाहन बालवडकर यांनी केले.
दरम्यान, सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत या कार्यक्रमाचा नागरिकांना लाभ घेता येणार आहे.

Web Title : Paduka Darshan Ceremony | paduka darshan ceremony of 12 shakti peeths in india lahu balwadkar social welfare initiative balewadi area

हे देखील वाचा :

Syed Mushtaq Ali Trophy | राहुल द्रविडच्या ‘या’ शिष्याचे धमाक्यात कमबॅक !

PM Kisan | खुशखबर ! शेतकर्‍यांना 10 व्या हप्त्यात 4000 रुपयांसह मिळतील 3 आणखी फायदे, जाणून घ्या कसे

Satara Police | दुर्देवी ! दीडच वर्षापुर्वी विवाह झालेल्या 29 वर्षीय पोलिसाचा हार्ट अटॅकने मृत्यू

Related Posts