PAK PM Imran Khan | इम्रान खान यांचा तिसरा विवाह आता घटस्फोटाच्या उंबरठ्यावर ?

लाहौर : वृत्तसंस्था – PAK PM Imran Khan | पाकिस्तानचे (Pakistan) पंतप्रधान इम्रान खान (PAK PM Imran Khan) हे गेल्या काही दिवसांपुर्वी त्यांच्या अनेक राजकीय वक्तव्यामुळे चर्चेत आले होते. सध्या इम्रान खान त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत चांगलेच चर्चेत आल्याचे दिसत आहे. कारण, इम्रान खान यांची तिसरी पत्नी बुशरा (Bushra) आता घर सोडून गेली आहे. बुशरा घर सोडून लाहौर (Lahore) येथे मैत्रिणीच्या घरी मुक्कामास गेली आहे. त्यामुळे आता त्यांचा घटस्फोट (Divorce) होणार अशा चर्चा ऊत धरत आहे.
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
2018 साली इम्रान खान (PAK PM Imran Khan) यांनी आपली दुसरी पत्नी रेहम खान (Reham Khan) हिच्याशी घटस्फोट घेतला. त्यानंतर 2018 साली इम्रान खान यांनी बुशरा यांच्याशी लग्न केले होते. दरम्यान काही काळापासून इम्रान हे सुफी संप्रदायाकडे झुकू लागल्याने ते बुशरा यांच्या माहेरी थांबत असत. या कारणामुळे त्या दोघांची परस्पर ओळख झाली होती. तर, बुशरा या स्वत:ला आध्यात्मिक हीलर असं संबोधतात. बुशरा यांनी इम्रान यांच्याशी लग्न (Married) केल्यानंतर त्यांच्या पीटीआय (PTI) या पक्षावर नियंत्रण मिळवल्याचं देखील सांगितलं जातेय.
दरम्यान, काही काळापूर्वी बुशरा यांच्यावर काळी जादू केल्याचा आरोप झाला होता. बुशरा यांचा स्वभाव अत्यंत तापट असून त्यांनी केवळ दरवाजा उघडायला उशीर झाला या कारणावरुन वीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. विवाह झाल्यानंतर बुशरा यांचा चेहरा त्यांच्याच घरातील अनेक नोकरांनी पाहिला नव्हता. त्यामुळे त्यांच्याभोवती रहस्याचे वलय निर्माण झाले होते. अनेकवेळा इम्रान खानने आपल्या पत्नीचे कौतुक देखील केलं होतं. दरम्यान, बुशरा यांनी बनी गाला हे खान यांचं घर सोडलं असून त्या आता लाहौर येथील आपल्या मैत्रिणीच्या घरी राहायला गेल्या आहेत. त्यामुळे हे लग्न देखील घटस्फोटाच्या चर्चेत अडकलं आहे.
Web Title :- PAK PM Imran Khan | imran khan bushra bibi marriage edge of divorce
Tu Tevha Tashi | ‘या’ मराठमोळी अभिनेत्रीचे 20 वर्षांनंतर पुनरागमन; नाव वाचून व्हाल…
Gold Silver Price Today | सोन्याच्या दरात मोठी वाढ तर चांदीही वधारली; जाणून घ्या ताजे दर
Comments are closed.