IMPIMP

Palghar ACB Trap | एक लाखाची लाच घेताना उपकार्यकारी अभियंता एसीबीच्या जाळयात

by nagesh
ACB Trap News | Anti-corruption Bureau Nanded: Women sarpanch and gram sevak caught in anti-corruption net while fleeing after taking bribe

पालघर : सरकारसत्ता ऑनलाइन – Palghar ACB Trap | विविध कामांचे बिल मंजूर करण्याकरीता बिलावर सही करुन केवळ वरिष्ठ कार्यालयात पाठविण्याकरीता तब्बल १ लाख रुपयांची लाच (Bribe) घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) महावितरणच्या उपकार्यकारी अभियंताला (MSEB Deputy Executive Engineer) रंगेहाथ पकडले. (Palghar ACB Trap)

ज्ञानेश्वर रघुनाथ वट्टमवार (Dnyaneshwar Raghunath Vattamwar) असे या उपकार्यकारी अभियंताचे नाव आहे.

याप्रकरणी एका ५६ वर्षाच्या ठेकेदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. तक्रारदार यांनी महावितरणच्या वाडाअंतर्गत केलेल्या विविध कामांचे बिल सादर केले होते. या बिलावर सही करुन ते वरिष्ठ कार्यालयात पाठविण्यासाठी उपकार्यकारी अभियंता वट्टमवार याने १ लाख रुपयांची लाच मागितली. याची तक्रार पालघर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Palghar ACB Trap) आली. त्याची पडताळणी केली असता वट्टमवार याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले (Superintendent of Police Punjabrao Ugale), अपर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर (Additional Superintendent of Police Anil Gherdikar) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक नवनाथ जगताप (Deputy Superintendent of Police Navnath Jagtap), पोलीस निरीक्षक स्वपन बिश्वास (Police Inspector Swapan Biswas), हवालदार संजय सुतार (Sanjay Sutar), विलास भोये, निशा मांजरेकर, अमित चव्हाण, नवनाथ भगत, सखाराम दोडे यांनी महावितरणच्या वाडा कार्यालयात सापळा रचला. मंगळवारी रात्री तक्रारदाराकडून १ लाख रुपयांची लाच घेताना वट्टमवार याला पकडण्यात आले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Palghar ACB Trap | Deputy Executive Engineer caught in ACB’s net while taking bribe of Rs

हे देखील वाचा :

Rain in Maharashtra | महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती, आज पुण्यासह ‘या’ जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज

Pune Crime | इमारतीवरुन पडून कामगाराचा मृत्यु; बिल्डर, ठेकेदारावर गुन्हा दाखल

CM Eknath Shinde Group-BJP | राज्य सरकारच्या विविध समित्यांवरील नियुक्त्यांबाबत; शहर-जिल्हा भाजप आणि शिंदे गटाच्या पदाधिकार्‍यांची झाली गुप्त बैठक

Related Posts