IMPIMP

Palghar News | संतापजनक ! अवघ्या 500 रुपयांमध्ये 2 अल्पवयीन मुलींना विकले, जव्हारमधील धक्कादायक प्रकार

by nagesh
Palghar News | 2 minor girls sold for child labor for just rs 500 incident in jawhar

जव्हार :  सरकारसत्ता ऑनलाइन – पालघर (Palghar News) जिल्ह्यातील जव्हार या ठिकाणाहून एक संतापजनक घटना समोर आली आहे. यामध्ये कुटुंबाची असलेली आर्थिक परिस्थिती आणि अगतिकता याचा फायदा घेऊन जव्हारमधील धारणहट्टी येथील दोन अल्पवयीन मुलींची पाचशे रुपयांमध्ये विक्री (2 minor girls sold for child labor) केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. (Palghar News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

काय आहे नेमके प्रकरण ?

मनीषा नरेश भोये आणि काळू नरेश भोये अशी या पीडित अल्पवयीन मुलींची नावे आहेत. अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील एका मेंढपाळाकडे मनीषा 3 वर्षांपासून तर काळू एक वर्षापासून बालमजुर म्हणून काम करत होते. मागील काही वर्षांपासून या दोन्ही चिमुकल्या या मेंढपाळाकडे  मेंढ्यांची साफसफाई, घरगुती काम, मेंढ्यांसोबत गुराखी जाणे हि कामे करत होत्या. या बदल्यात या मुलींच्या कुटुंबियांना वर्षाकाठी 12 हजार रुपये आणि एक मेंढी देण्याचं आश्वासन  मेंढपाळाकडून दिले गेले होते. मात्र प्रत्यक्षात वर्षाला फक्त पाचशे रुपये दिले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Palghar News)

श्रमजीवी संघटनेने पुढाकार घेतल्यामुळे हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. यानंतर मुलींना खरेदी केलेल्या मेंढपाळा विरोधात जव्हार पोलीस ठाण्यात (Jawhar Police Station) कलम 3(1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर पोलिसांनी या दोन मुलींचा तपास केला असता आठ वर्षीय मनीषाचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले तर सहा वर्षीय काळु भोये हिचा जव्हार पोलिसांकडून अजून शोध सुरू आहे. या प्रकरणात तपासानंतर पुढील कारवाई केली जाईल अशी माहिती जव्हार पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Web Title:  Palghar News | 2 minor girls sold for child labor for just rs 500 incident in jawhar

 

हे देखील वाचा :

Maharashtra Politics | आम्ही काँग्रेस-शिवसेनेसोबत आघाडी करायला तयार, असे म्हणत प्रकाश आंबेडकरांनी राष्ट्रवादीवर केला गंभीर आरोप

Anti Corruption Bureau (ACB) Nanded | लाच घेताना पकडलेल्या पोलिसाचे एसीबीच्या जाळ्यातून पलायन

Shivsena Vs MNS | शिवसेना-मनसेत जुंपली ! दानवे म्हणाले – ‘मनसे भाजपाची दुसरी शाखा, संदीप देशपांडेंनी दिले प्रत्युत्तर’

 

 

Related Posts