IMPIMP

Palghar Sadhu Case | पालघर साधू हत्याकांडातील 10 जणांना हायकोर्टाकडून दिलासा

by nagesh
Palghar Sadhu Case | palghar sadhu murder 10 released on bail mumbai bombay high court Justice Bharati Dangre

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Palghar Sadhu Case | पालघर येथील साधू हत्याकांडातील १० आरोपींना हत्येसाठी जबाबदार धरता येईल असे कोणतेही कृत्य त्यांच्याकडून झाले नाही. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High Court) न्या. भारती डांग्रे (Justice Bharati Dangre) यांच्या एकल पीठाने १० आरोपींचा जामीन मंजूर केला आहे (Accused Granted Bail). तर उर्वरित ८ जणांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. (Palghar Sadhu Case)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

गतवर्षी दरोडेखोर असल्याचे समजून साधू आणि त्यांच्या चालकाला गावकऱ्यांनी मारहाण केली होती. साधूंनी आपण नाशिकचे असून गुरूंच्या अंतिम दर्शनासाठी जात असल्याचे सांगितले होते. मात्र, तरीही त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली होती. दरम्यान, पोलिसांनी अनेक जणांवर गुन्हा दाखल करून अटक केली होती. त्यापैकी गेल्यावर्षी जानेवारीत ठाणे सत्र न्यायालयाने (Thane Sessions Court) ८९ आरोपींची जामिनावर सुटका केली. तर १८ जणांचा अर्ज नामंजूर केला होता. त्यामुळे या १८ जणांनी जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्या अर्जावर न्या. डांग्रे यांच्या एकल खंडपीठासमोर सुनावणी झाली. (Palghar Sadhu Case)

सुनावणीत अर्जदार घटनास्थळी हातात शस्त्रे घेऊन उभे होते. असे पोलिसांचे म्हणणे आहे. परंतु, त्यांनी कोणते कृत्य केले हे स्पष्ट होत नाही. याकडे न्यायालयाने लक्ष वेधत सीसीटीव्हीत इतर आठ जण साधूला मारहाण करत आहेत तसेच ते इतरांनाही मारहाणीला बोलवत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे त्यांचा जामीन नामंजूर केला तर १० जणांची न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली.

Web Title :- Palghar Sadhu Case | palghar sadhu murder 10 released on bail mumbai bombay high court Justice Bharati Dangre

हे देखील वाचा :

Pune Crime | खून करुन केला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव; कात्रज परिसरातील धक्कादायक घटना

Maharashtra Police | महाराष्ट्रात पोलीस कर्मचार्‍याचा अर्ज पाहून वरिष्ठ अधिकारी चक्रावले, मॅरेज अ‍ॅन्व्हर्सरीला म्हटले पश्चाताप दिवस

Aryan Khan Drugs Case | आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील NCB चा साक्षीदार प्रभाकर साईलचा 37 व्या वर्षी मृत्यु; समीर वानखेडेंवर केला होता आरोप; जाणून घ्या काय झालं

Related Posts