Palkhi Sohala In Satara | माऊलींच्या पालखीतील वाहने न सोडल्याने पालखी विश्वस्त- पोलिसांमध्ये वाद
फलटण: Palkhi Sohala In Satara | फलटणमधील मुक्काम आटपून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा बरडच्या दिशेने निघाला असता फलटण येथील नाना चौकामध्ये वारीतील वाहने तात्काळ न सोडल्याने आळंदी संस्थान विश्वस्त व पोलिसांमध्ये खडाजंगी झाली. फलटणमधून माऊलींची पालखी बरड च्या दिशेने मुक्कामासाठी जात असते.
जाताना विडणी येथे पहिला विसावा असतो. यावेळी पालखीतील वाहने पुढे जाणे अपेक्षित असते. पुढे जाऊन दिंडीतील वारकऱ्यांना नाष्टा केला जातो. परंतु पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे दिंडीतील वाहने वाहतूक पोलिसांकडून सोडण्यात आली नाहीत.
दिंडीतील काहींनी विश्वस्तांना कल्पना दिल्यावर ते स्वतः ट्रॅफिक नियंत्रण करू लागले. माऊलींचा रथ सकाळी नाना पाटील चौकातून ८ वाजून ३६ मिनिटांनी बरड कडे मार्गस्थ झाला. आळंदी संस्थांच्या झालेल्या मीटिंगमध्ये संस्थांकडून दिलेल्या सूचनांचे पालन पोलिसांकडून होत नसल्याने आळंदी संस्था कमिटीकडून तीव्र नाराजी होत आहे. तसेच वाहतूक सुरळीत करण्यासाठी श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संस्थांचे विश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ , गुरु हैबतबाबा यांचे वंशज बाळासाहेब पवार (आरफळकर) रस्त्यावर उतरले होते.
Comments are closed.