IMPIMP

PAN Card ऑनलाइन कसे करावे व्हेरिफाय, जाणून घ्या सविस्तर प्रक्रिया

by nagesh
PAN Card | how to verify pan card only check details

नवी दिल्ली : वृत्तसंस्था– PAN Card | देशातील नागरिकांसाठी परर्मनंट अकाऊंट नंबर म्हणजे पॅन (Permanent Account Number-PAN) सर्वात महत्वाचे कागदपत्र मानले जाते. याचा वापर केवळ टॅक्ससाठी नव्हे, तर ओळखपत्र म्हणूनही केला जातो. तसेच आर्थिक व्यवहारांसाठी सुद्धा पॅनची प्रामुख्याने गरज असते. PAN Card देशाचे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट (Income Tax Department) जारी करते.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या पोर्टलवर आयटीआर ई-फायलिंगमध्ये पॅन रजिस्टर असणे आवश्यक आहे. पॅनकार्ड इन्कम टॅक्स पोर्टलसोबत लिंक्ड आहे किंवा नाही, हे तुम्ही स्वत: व्हेरिफाय करू शकता.

जाणून घेवूयात PAN Card ऑनलाईन कसे करावे व्हेरिफाय

– इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची वेबसाइट www.incometax.gov.in वर जा.

– आता Quick Links सेक्शनमध्ये Verify Your PAN वर क्लिक करा.

– आता नवीन पेज उघडेल. येथे पॅन नंबर नोंदवा.

– याशिवाय बॉक्समध्ये आपले पूर्ण नाव, डेट ऑफ बर्थ आणि रजिस्टर्ड मोबाइल नंबर टाका.

– आता Continue वर क्लिक करा.

– इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून मिळालेला ओटीपी टाका.

– आता Validate वर क्लिक केल्यावर PAN is Active and details are as per PAN मेसेज लिहिलेला दिसेल.
अशाप्रकारे तुमचे पॅन व्हेरिफाय होते.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

Web Title :- PAN Card | how to verify pan card only check details

हे देखील वाचा :

Retired ACP Shamsher Khan Pathan | ’26/11 हल्ल्यावेळी परामबीर सिंहांनी अतिरेकी कसाबचा मोबाईल लपवला’; निवृत्त ACP शमशेर खान-पठाण यांचा आरोप

Pune Crime | कोंढाव्यात वीज खंडीत झाल्याने महावितरणच्या कर्मचार्‍यांना मारहाण

ST Workers Strike | आझाद मैदानावरील एसटी कामगारांचे आंदोलन मागे; विलिनीकरणासाठी लढा सुरु ठेवणार

Related Posts