पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त; तब्बल 2.5 हजार पोलिस राहणार तैनात

by Team Deccan Express
pandharpur mangalvedha election two and half thousand police will provide security 12 hours

सोलापूर : सरकारसत्ता ऑनलाइन – पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी election मतदान होणार आहे. त्यानुसार, मतदानाच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. त्यामध्ये तब्बल अडीच हजार पोलिसांचा फौजफाटा असणार आहे.

सरकारच्या पॅकेजवरुन चंद्रकांत पाटलांची टीका, म्हणाले -‘गरीब वर्गाला मदत केल्याचा आव आणला, केलेली मदत तुटपुंजी’

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचे निधन झाले होते. त्यामुळे या रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. 17 एप्रिलला मतदान घेण्यात येणार आहे. त्यासाठी पोलिस प्रशासनही सज्ज झाले आहे. या मतदान प्रक्रियेसाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात असणार आहे. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील संवेदनशील असणाऱ्या 16 मतदान केंद्रांवर विशेष पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. मतदानाच्या दिवशी स्थानिक पोलिस, होमगार्ड, राज्य राखीव पोलिस दलाच्या तुकड्या असा अडीच हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात येणार असल्याचे प्रभारी पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांनी सांगितले.

नाना पटोलेंचे फडणवीसांना प्रत्युत्तर, म्हणाले -‘फडणवीसांचे जर दिल्लीत वजन असेल तर…

संचारबंदी काही कालावधीसाठी शिथिल
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत election मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी सोलापूर जिल्ह्यात जारी करण्यात आलेली संचारबंदी 16 एप्रिल 2021 रोजीच्या रात्री आठ वाजल्यापासून ते 18 एप्रिल 2021 रोजीच्या सकाळी सात वाजेपर्यंत शिथिल करण्यात आली आहे. मात्र, जमावबंदीचे आदेश लागू ठेवण्यात आले आहेत.

नाना पटोले म्हणाले, ‘मोदी लोकांना म्हणताहेत मास्क घाला अन् स्वत: मात्र…’

पोलिसांचा मोठा फौजफाटा
पोलिस अधीक्षक 1, अप्पर पोलिस अधीक्षक 1, उपविभागीय पोलिस अधिकारी 6, पोलिस निरीक्षक 8, सहाय्यक पोलिस निरीक्षक 32, पोलिस कर्मचारी 803, होमगार्ड 550 तर 60 वाहनेही असणार आहेत. केंद्रीय (सीआरपीएफ) व राज्य (एसआरपीएफ) दलाच्या पाच तुकड्या पंढरपुरात दाखल झाल्या आहेत. या एका तुकडीत 100 असे एकूण 500 जवान मतदान केंद्रांवर तैनात करण्यात येणार आहेत.

Read More : 

फडणवीसांचा मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंवर निशाणा, म्हणाले – ‘मुंबई-पुण्याच्या बाहेरही महाराष्ट्र आहे’

महाराष्ट्रातच नाही तर गुजरात, उत्तर प्रदेशाकडेही पहा; रोहित पवारांनी विरोधकांना सुनावलं

पंढरपूरमध्ये बरसले पडळकर आणि दरेकर; म्हणाले – ‘आघाडी सरकार पांढर्‍या पायाचे, बलात्कारी’

मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांचा गंभीर इशारा, म्हणाले – ‘…याचा परिणाम संपूर्ण देशावरच होईल’

Raju Shetty : ‘जगणं-मरणं आमच्या नशीबावर सोडा, लॉकडाऊन लावू नका’

Balasaheb Thorat : आज-उद्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे घोषणा करतील, 14 दिवसांच्या Lockdown शिवाय पर्याय नाही

अनिल देशमुख यांना CBI चं समन्स, 14 एप्रिलला चौकशी

कंगना राणावत ठाकरे सरकारला म्हणाली – ‘चंगू मंगू गँग, मग ट्रोलर्सने…

चंद्रकांत पाटलांनी ठाकरे सरकारला Lockdown वर सुचवला ‘उपाय’, म्हणाले ; ‘लॉकडाऊनऐवजी…’

Related Posts

Leave a Comment