IMPIMP

Pandit Birju Maharaj Passes Away | प्रसिद्ध कथ्थक नृत्यकार पंडीत बिरजू महाराज यांचे निधन

by nagesh
Pandit Birju Maharaj Passes Away | legendary kathak dancer pandit birju maharaj passes away at 83

सरकारसत्ता ऑनलाइन – Pandit Birju Maharaj Passes Away | लखनऊ घराण्याशी संबंध असलेले प्रसिद्ध कथ्थक नृत्यकार पंडीत बिरजू महाराज (वय ८३) यांचे निधन झाले.  त्यांचे नातू स्वरांश मिश्रा यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली. त्यांचे खरे नाव बृज मोहन मिश्रा होते. (Pandit Birju Maharaj Passes Away)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

लखनऊमध्ये ४ फेब्रुवारी १९३८ मध्ये त्यांचा जन्म झाला. पंडीत बिरजू महाराज हे एक गुरू, नृत्यकार, कोरिओग्राफर, गायक आणि संगीतकार होते. त्याचबरोबर ते वाद्य वाजवायचे, कविता लिहायचे तसेच ते चित्र सुद्धा रेखाटत होते. त्यांचे जगभरात अनेक शिष्य सुप्रसिद्ध कलाकार आहे.

पंडीत बिरजू महाराज यांना १९८३ मध्ये  पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बॉलिवूड च्या अनेक चित्रपटांमध्येही त्यांनी  नृत्यदिग्दर्शनही केले. ज्यामध्ये उमराव जान, देढ इश्किया, बाजीराव मस्तानी या चित्रपटांचा समावेश आहे. विश्वरूपम चित्रपटातील नृत्यदिग्दर्शनासाठी २०१२मध्ये त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि कालिदास सन्मान देखील पंडीत बिरजू महाराज यांना मिळाला आहे.

Web Title : Pandit Birju Maharaj Passes Away | legendary kathak dancer pandit birju maharaj passes away at 83

हे देखील वाचा :

Ibrahim Ashq | ‘कहोना प्यार है’, ‘क्रिश’, ‘वेलकम’ चित्रपटांचे गीतकार इब्राहिम आश्क यांचे ‘कोरोना’मुळे निधन

Pune Weekend Lockdown | ‘पुण्यात विकेंड लॉकडाऊनचा निर्णय शुक्रवारी’ – उपमुख्यमंत्री अजित पवार

Ajit Pawar | ‘राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच, ‘आदित्य’ हा शब्द मागे घेतो’ – अजित पवारांचं स्पष्टीकरण

Henley Passport Index 2022 | वाढला भारतीय पासपोर्टचा रुतबा ! आता तुम्ही 59 देशात जाऊ शकाल विना व्हिसा

Restrictions In Pune | कोरोनाचे निर्बंध वाढणार का? पुण्यातील आढावा बैठकीनंतर अजित पवार म्हणाले…

Related Posts