IMPIMP

Pankaja Munde | ‘…कोणत्या नेत्याची चमचेगिरी करण्यासाठी नाही, तर’, दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंची तुफान फटकेबाजी (व्हिडीओ)

by nagesh
Pankaja Munde | bjp leader pankaja mude on bhagvangad melava video

बीड : सरकारसत्ता ऑनलाइन Pankaja Munde | बीडच्या सावरगाव घाट येथील भगवान भक्तीगडावर (Bhagwan Bhaktigad) पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा दसरा मेळावा (Dussehra Melava) सुरू आहे. तत्पुर्वी पंकजा मुंडे हेलिकॉप्टरने भगवानगडावर दाखल झाल्या होत्या. यावेळी त्यांनी हेलिकॉप्टरमधून फुलांचा वर्षाव केला. दसरा मेळाव्यादरम्यान बोलताना पंकजा मुंडे यांनी कोणत्या नेत्याची चमचेगिरी करण्यासाठी फुलं टाकत नव्हते, तर भगवानदादांसाठी आणि तुमच्यासाठी वाहत होते. असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

आज (शुक्रवारी) विजयादशमी दसरा निमित्त आयोजित दसरा मेळावा (Dussehra Melava) कार्यक्रमादरम्यान भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) बोलत होत्या. त्यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, ही दसऱ्याची जी भक्ती आणि शक्तीची जी परंपरा आहे ती कायम ठेवण्यासाठी घऱची पुरणपोळी सोडून आले आहात सांगत पंकजा मुंडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. देशात असा सोहळा कुठे होत नसेल असं देखील पंकजा मुंडे यावेळी सांगितलं आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

पंकजा मुंडे (Pankaja Munde) म्हणाल्या, आपण जिथे जन्म घेतला त्या मातीचा, जातीचा आपल्याला कधी कमीपणा नाही वाटला पाहिजे अशी गोपीनाथ मुंडेंची शिकवण आहे. राजघराणं असो किंवा वंचितांमध्ये जन्म झालेला असो लाज वाटली नाही पाहिजे. आज महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे त्यासाठी ही परंपरा उभी केली आहे. कोणत्या पक्षाचं, मतांचं राजकारण नाही, तर सामान्यांची चळवळ येथून उठत आहे, जी राज्याच्या कानाकोपऱ्यात जाते.

पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, “पंकजाताई घरात बसलेत म्हणून खूश झालेल्यांनी माझा दौरा लिहून घ्या. मी दिल्ली, नवी मुंबई, नाशिकच्या दौऱ्यावर असणार आहे. ऊसाच्या फडात जाऊन संवाद साधणार आहे. लोकांना कोरोनामध्ये बेड, औषधं मिळत नव्हती. त्यावेळी मी दौरे करायला हवे होते का? तुमची काळजी वाटली म्हणून दौरे नाही केले. पण घरात बसून नव्हते, कोविड सेंटर सुरु केले होते. घरोघरी आम्ही डबे पोहोचवले, असं त्यांना सांगितलं.

सरकारने नुसतं पॅकेज जाहीर करुन चालणार नाही, प्रत्येकाच्या हातात मदत द्यावी आणि दिवाळी गोड करावी.
फक्त मोदींचे तेवढे पैसे येत आहेत. पण राज्य सरकारचे, पालकमंत्र्यांचे आले का? पण असं काही बोललं की यांना राग येतो.
आता तुम्ही सत्तेत आहात तर तुम्हाला विचारणार ना, तुम्ही विरोधात होता तेव्हा तर धमक्या देत होतात, असा घणाघातही त्यांनी लगावला.
तसेच, राज्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. महिलांवर अत्याच्यार, बलात्कार होत आहेत.
महिलांकडे वाकडी नजर करुन जरी पाहिलं तर डोळे काढून घेणाऱ्याची ही भूमी आहे. हत्तीच्या पायाखाली दिलं पाहिजे.
राज्यात काय चाललंय काय? त्यावर बोलायचं नाही, आरोपींवर बोलायचं नाही.
सरकार जर असं काम करत असेल तर जाब विचारायचा की नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

दरम्यान, पुढे त्या म्हणाल्या, ऊसतोड कामगार मंडळाचं काय झालं असं मला विचारतात.
पण मला जसं हवं होतं आणि ज्या वेगाने हवं होतं तसं ऊसतोड कामगार मंडळ झालं नाही हे मान्य करते.
पण आज नोंदणी सुरु झाली आहे. त्याची पायाभरणी आपण केली आहे, तसेच, मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण सर्वांसाठी मी आवाज उठवणार आहे.
असं जाहीर करताना पंकजा मुंडे यांनी एकमेकांमध्ये भांडण लावल्याचं कटकारस्थान रचलं जात आहे, असा आरोप देखील केला आहे.

Web Title :- Pankaja Munde | bjp leader pankaja mude on bhagvangad melava video

हे देखील वाचा :

Gulabrao Patil | ”सायकल चोरणारे नारायण राणे मंत्री झाले” – शिवसेना नेते गुलाबराव पाटील

Mayor Murlidhar Mohol | पुणे मेट्रोच्या थांबलेल्या कामाचा निर्णय येत्या 8 दिवसांत, महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती

Pune Fire News | लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या 17 सिटर मिनीबसला लागलेल्या आगीत बस जळून खाक

Related Posts