IMPIMP

Pankaja Munde | ‘लवकरच समजेल..’! विधानपरिषदेच्या उमेदवारीवरून पंकजा मुंडेंचं मोठं वक्तव्य

by nagesh
Pankaja Munde | then your father will not be the prime minister pankaja mundes statement will be discussed

बीड : सरकारसत्ता ऑनलाइन Pankaja Munde | गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्या (BJP Leader) आणि माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना राज्यसभेची उमेदवारी मिळण्यावरुन सर्वत्र चर्चेला उधाण आलं होतं. दरम्यान यामध्ये त्यांना संधी मिळाली नाही. आता 20 जून रोजी होणाऱ्या महाराष्ट्र विधानपरिषद निवडणूकीमध्ये (Maharashtra Legislative Council Elections) पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळेल का ? याबाबत अनेक चर्चेला ऊत आला आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर बोलताना पंकजा म्हणाल्या की, ‘नावे अनेक चर्चेमध्ये आहेत, पक्ष काय निर्णय घेईल ते आगामी काळात बघुयात.’ त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

तुमच्या समर्थकांना वाटतं की तुम्हाला उमेदवारी मिळावी, याबाबत पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना सवाल करण्यात आला. यावर त्या म्हणाल्या, “माझ्याविषयी लोकांची इच्छा हीच माझी शक्ती आहे. सध्या नावे अनेक चर्चेत आहेत. पक्ष काय निर्णय घेईल ते कळेलच. काही फार लांब नाहीये. लवकरच समजेल. तेव्हाचं तेव्हा पाहू” अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली आहे.

नावाची चर्चा होते. मात्र पक्ष संधी देत नाही की नेमकं काय घडतेय ? असं विचारताच पंकजा म्हणाल्या की, “मी कुठल्या संधीची अपेक्षा करत नाही.
कुठल्या संधीसाठी मी प्रयत्नही करत नाही. संधी मिळावी यासाठी वाट पाहणाऱ्या राजकारण्यांमध्ये माझा नंबर नाही.
जे मिळते त्याची संधी करुन दाखवणे, संधीचे सोने करुन दाखवणे हे माझं काम आहे.
हे माझे संस्कार आहेत. गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांनी जी पदं भुषवली त्या पदाला त्यांनी आणखी मोठं केलं.
संधीसाठी रांगेत वाट पाहतेय, ही माझी प्रवृत्ती नसल्याचं,” त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Web Title :- Pankaja Munde | BJP leader pankaja munde on maharashtra legislative council and rajya sabha candidate said not waiting for chance

हे देखील वाचा :

Online Fraud | 45 कोटी लोकांसाठी महत्वाची बातमी ! SBI ने म्हटले – ‘लक्षात ठेवा ‘ही’ गोष्ट, होणार नाही पश्चाताप’

Aadhaar Security Tips | आधार कार्ड शेयर किंवा वापरताना अवलंबा ‘या’ 8 सिक्युरिटी टिप्स, सरकारने दिली माहिती

Hukmichand Chordia Passess Away | पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक, ‘प्रवीण मसालेवाले’ चे संस्थापक हुकमीचंद चोरडिया यांचं निधन

Related Posts