IMPIMP

Pankhuri Shrivastava | कोट्यधीश पंखुरी श्रीवास्तव यांचे 32 व्या वर्षी निधन; अखेरची सोशलवरील पोस्ट चर्चेत

by nagesh
pankhuri shrivastava | pankhuri shrivastava who died at 32 spoke of evaluating candidates in last social media post

सरकारसत्ता ऑनलाइन  – Pankhuri Shrivastava | ग्रॅबहाऊसच्या संस्थापक पंखुरी श्रीवास्तव (Pankhuri Shrivastava) यांचे अवघ्या 32 व्या वर्षी निधन (Died) झाल्याची माहिती समोर आली आहे. अवघ्या कमी वयात उद्योग क्षेत्रात मोठी भरारी घेतलेल्या पंखुरी यांच्या निधनाने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 24 डिसेंबर रोजी पंखुरी यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे. दरम्यान, निधनापुर्वीची सोशल मीडिया पोस्ट आता समोर आली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) झांसी येथे राहणाऱ्या पंखुरी श्रीवास्तव (Pankhuri Shrivastava) वयाच्या 25 व्या वर्षी झासीहून मुंबईत (Mumbai) दाखल झाल्या. या ठिकाणी त्यांना भाड्याने घर घेण्यासाठी अडचण निर्माण झाली होती. ब्रोकर्सना खूप पैसे द्यावे लागल्यानंतर त्यांच्या डोक्यात नवीन कल्पना आली. यावरून जी घर शोधण्यात लोकांना मदत करेल अशी कंपनी त्यांनी सुरु केली होती. दरम्यान, त्यांनी 20 हजार रूपयांच्या भांडवलावर ग्रॅबहाऊसची (Grabhouse Company) सुरूवात केली होती. या कंपनीची वर्षाची उलाढाल 720 कोटीपर्यंत पोहोचली होती.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

दरम्यान, निधनाच्या आधी एक दिवस म्हणजे 23 डिसेंबर रोजी पंखुरी यांनी ट्विटच्या माध्यमातून एक पोस्ट केली होती. ‘एका तासाच्या मुलाखतीत एखाद्या उमेदवाराच्या क्षमता आणि त्याचे मुल्यांकन करणे कठीण आहे. सर्वच उमेदवारांनी एकसारखे लेख वाचले. त्यामुळे चांगले काम करणार्‍या आणि सारख्या भाषा बोलणार्‍या कंपन्यांकडून सारख्याच गोष्टी जाणून घेतल्यासारखे वाटले. असे म्हणत रेफ चेक हा एकमेव मार्ग आहे का? असा सवालही पंखुरी यांनी उपस्थित केला होता.

Web Title: pankhuri shrivastava | pankhuri shrivastava who died at 32 spoke of evaluating candidates in last social media post

हे देखील वाचा :

Nora Fatehi | ‘हे’ गुण असणार्‍यासोबत रिलेशनशिपमध्ये रहायला आवडेल, नोरा फतेहीनं सांगितलं

Sleeping Tips | रात्री झोपताना तुमच्या अवतीभोवती करा ‘हे’ 5 बदल, मिळेल चांगली झोप आणि चांगले आरोग्य

Narayan Rane | नारायण राणेंचा जोरदार हल्ला, म्हणाले – ‘आदित्य आणि मांजराचा काय संबंध, अजित पवारांना ओळखत नाही, भास्कर जाधव नाचे’

Related Posts