IMPIMP

Panshet Dam | पानशेत धरण 100 टक्के भरले ! नदीत 7376 क्युसेक्सचा विर्सग सुरु, मुळशीही 88 टक्के भरले

by nagesh
Panshet Dam | Panshet Dam 100 percent full The discharge of 7376 cusecs started in the river 88 percent of the river was filled

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Panshet Dam | गेले काही दिवस सुरु असलेल्या पावसाने पानशेत धरण १०० टक्के भरले असून सकाळी ९ वाजल्यापासून धरणातून ७ हजार ३७६ क्युसेक्स पाणी नदीत सोडण्यात येत आहे. पाणलोट क्षेत्रात अजूनही जोरदार पाऊस पडत असून धरणाच्या जलाशयात जमा होणारे पाणी लक्षात घेऊन त्यानुसार पाणी सोडण्यात येणार आहे. खडकवासला धरण ७४ टक्के भरले असून तेथून अजूनही नदी पात्रात पाणी सोडण्यात सुरुवात झालेली नाही मात्र, खडकवासला धरण भरल्यास तेथूनही पाणी सोडण्यात येणार आहे. त्याचवेळी मुळशी धरणातून लवकरच पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे. पानशेत धरण आज सकाळी १०० टक्के भरले. त्यामुळे धरणाच्या सांडव्यावरुन नदीपात्रामध्ये सुरुवातीला ३९०८ क्युसेक्स पाणी नदीपात्रात सोडण्यात येऊ लागले. त्यानंतर सकाळी ९ वाजता हा प्रवाह ७३४६ क्युसेक्सपर्यंत वाढविण्यात आला आहे. त्यामुळे नदी पात्रातील पाण्यात कोणी उतरु नये, असे आवाहन सहायक अभियंता यो. स. भंडलकर यांनी केले आहे. (Panshet Dam)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

टेमघर धरण ७४ टक्के, वरसगाव ९० टक्के, खडकवासला ७५ टक्के धरण भरले आहे. कळमोडी, चासकमान, भामा आसखेड, आंद्रा, गुंजवणी ही धरणे १०० टक्के भरली आहेत. वीर धरण ९८ टक्के भरले असून धरणातून २३ हजार १८५ क्युसेक्स पाणी नदीत सोडण्यात येत आहे. विशेष म्हणजे उजनी धरण ९४ टक्के भरले आहे. (Panshet Dam)

खडकवासला धरण प्रकल्पात आजअखेर ९५ टक्के पाणीसाठा झाला आहे.

मुळशी धरणातून पाणी सोडण्यात येणार

मुळशी धरण आज सकाळपर्यंत ८८.७४ टक्के भरले आहे. धरण पाणलोट परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस होत आहे.
गेल्या २४ तासात दावडी येथे ३०४ मिमी पावसाची नोंद झाली असून गेल्या २४ तासात एकूण ४९.४९ द ल घ मी पाण्याची आवक झाली आहे.
पाऊस असाच राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
हे पाहता पुढील काही काळात आवश्यकतेनुसार धरणाच्या सांडव्यातून नियंत्रित विसर्ग सोडण्यात येणार आहे.
त्यामुळे नागरिकांनी नदीपात्रात उतरु नये तसेच नदी पात्रात काही साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलवावीत,
असे आवाहन टाटा पॉवरचे प्रमुख बसवराज मुन्नोळी यांनी केले आहे.

पाऊस वाढला व खडकवासला धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यास सुरुवात झाली आणि त्याचवेळी मुळशी धरणातून विसर्ग सुरु झाला तर बंडगार्डनच्या पुढे नदीतील पाणीसाठ्यात वाढ होणार आहे.
त्यामुळे पुढील भागात फुगवटा होण्याची शक्यता आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title : –  Panshet Dam | Panshet Dam 100 percent full The discharge of 7376 cusecs started in the river 88 percent of the river was filled

हे देखील वाचा :

Rain in Maharashtra | राज्यात आज ‘येलो अलर्ट’ ! पुणे, मुंबई आणि उपनगरात मुसळधार पावसाची शक्यता

Bacchu Kadu | बच्चू कडूंना मंत्रिपद मिळणार का ? दीपक केसरकर म्हणाले…

Maharashtra Jalana IT Raid | जालनामध्ये स्टील फॅक्टरीमध्ये प्राप्तीकर विभागाचा छापा ! 390 कोटींची संपत्ती जप्त, रोकड मोजण्यासाठी लागले 13 तास

Related Posts