IMPIMP

Parambir Singh | परमबीर सिंह यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा ! आरोपपत्र दाखल न करण्याचे मुंबई पोलिसांना आदेश

by nagesh
Parambir Singh | Big relief parambir singh supreme court has ordered not file any chargesheet against parambir singh

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांना सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) मोठा दिलासा दिला आहे. परमबीर सिंह यांच्या प्रकरणावर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने राज्यातील पोलिसांऐवजी (state police) अन्य एजन्सीकडून तपास घेण्यास सांगितले आहे. तसेच, परमबीर सिंह (Parambir Singh) यांच्याविरोधात सध्यातरी कोणतीही चार्जशीट (Chargesheet) दाखल न करण्याचे आदेश मुंबई पोलिसांना (Mumbai Police) दिले आहेत. याशिवाय, त्यांना अटक न करण्याच्या आदेशही न्यायालयाने कायम ठेवला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

परमबीर सिंहांना तुर्तास अटकेपासून संरक्षण

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर 100 कोटी वसुलीचा आरोप प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंह (Parambir Singh) यांना अटक न करण्याचे आदेश यापूर्वीच्या सुनावणीत दिले होते. अटक न करण्याची मुदत आज संपत असल्याने या प्रकरणी पुन्हा सुनावणी झाली. यामध्ये परमबीर सिंह यांना मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने त्यांना तुर्तास अटकेपासून संरक्षण देत तपासात सहभागी होण्याचे आदेश दिले आहेत.

पुढील सुनावणी 11 जानेवारीला

सीबीआयने (CBI) न्यायालयात म्हटले की, महाराष्ट्र सरकारने परमबीर सिंह यांच्यावर नोंदवलेले सर्व खटले सीबीआयकडे वर्ग केल्यास आमची हरकत नाही. त्यावर न्यायालयाने सीबीआयला एका आठवड्यात लेखी प्रतिज्ञापत्र देण्यास सांगितले आहे. इतर पक्षकारांना सीबीआयच्या प्रतिज्ञापत्रावर उत्तर देण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत दिली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 11 जानेवारीला होणार आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

तपास सुरु राहणार

न्यायालयाने म्हटले की, परमबीर सिंग यांच्याविरुद्ध तपास राज्य पोलिसांनी न करता अन्य एजन्सीद्वारे केला जावा असे प्रथमदर्शनी मत आहे.
परमबीर यांच्याविरुद्ध मुंबई पोलिसांकडून कोणतेही चलन दाखल केले जाणार नसले
तरी तपास सुरुच राहणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.
सिंह यांच्यावर राज्यात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात खंडणी (Ransom), फसवणूक (fraud) यासरखे गुन्हे दाखल असून त्याचा तपास सुरु आहे.

Web Title :- Parambir Singh | Big relief parambir singh supreme court has ordered not file any chargesheet against parambir singh

हे देखील वाचा :

Post Office Scheme | विना जोखीम बँकेपेक्षा सुद्धा जास्त मिळवायचा असेल FD वर रिटर्न, तर Post Office मधून मिळवू शकता जास्त नफा! जाणून घ्या कसा??

Omicron Covid Variant | ओमायक्रॉन बाधितांची संख्या वाढणार पण स्थिती गंभीर नसणार; आयआयटी कानपूरच्या प्राचार्यांचा दावा

SIP Mutual Fund | मुलीचा विवाह करायचा असो किंवा निवृत्तीचा प्लान बनवायचा असो, SIP Formula मध्ये आहेत सर्व उपाय

Related Posts