IMPIMP

Parambir Singh | कोर्टानं फरार घोषित केलेले माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग अखेर मुंबईत अवतरले

by nagesh
Parambir Singh | process for parmbir singh suspension is underway says maharashtra home minister dilip wales patil

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Parambir Singh | राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर 100 कोटींच्या वसुलीचे आरोप करणारे मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) अखेर मुंबईत दाखल झाले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून परमबीर सिंग हे गायब होते. समन्स बजावून देखील ते हजर राहिले नाहीत. यानंतर परमबीर यांना मुंबई किला न्यायालयाने फरार घोषित केले. यानंतर परमबीर सिंग हे मुंबईत परतले आहेत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

न्यायालयाने एकीकडे परमबीर सिंग (Parambir Singh) यांना फरार घोषित केलं आहे. तर दुसरीकडे सर्वाेच्च न्यायालयात (Supreme Court) दाखल असलेल्या याचिकेत परमबीर यांच्या वकिलांनी ते फरार नसून देशातच असल्याचा दावा केला होता. तसेच ते लवकरच मुंबईत परतणार असल्याची माहिती न्यायालयाला दिली होती. पण त्यांनी मुंबई पोलिसांवर आपला विश्वास नसल्याचं सांगत केंद्रीय यंत्रणांनी चौकशी करावी, अशी विनंती परमबीर यांच्या वकिलांनी न्यायालयात केली. सर्वाेच्च न्यायालयाने या प्रकरणी परमबीर यांना अटक (Arrested) न करण्याचे आदेश दिले होते. यानंतर आता परमबीर हे मुंबईत दाखल झाले आहेत.

दरम्यान, गोरेगाव पोलीस ठाणे (Goregaon Police Thane) येथे दाखल असलेल्या खंडणीच्या गुन्ह्याप्रकरणी (extortion case) न्यायालयाने परमबीर सिंग यांना फरार घोषित केलं होतं.
कोर्टाची हीच नोटीस आता परमबीर यांच्या जुहू येथील फ्लॅटच्या दरवाज्यावर लावण्यात आलीय.
संबंधित कारवाई ही न्यायालयाच्या आदेशान्वये करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून दिली आहे.
दरम्यान, या प्रकरणाची पुढील सुनावणी ही 6 डिसेंबर रोजी आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

Web Title :- Parambir Singh | former mumbai cp param bir singh has landed in mumbai

हे देखील वाचा :

PAN Card ऑनलाइन कसे करावे व्हेरिफाय, जाणून घ्या सविस्तर प्रक्रिया

Retired ACP Shamsher Khan Pathan | ’26/11 हल्ल्यावेळी परामबीर सिंहांनी अतिरेकी कसाबचा मोबाईल लपवला’; निवृत्त ACP शमशेर खान-पठाण यांचा आरोप

Pune Crime | कोंढाव्यात वीज खंडीत झाल्याने महावितरणच्या कर्मचार्‍यांना मारहाण

Related Posts