IMPIMP

Parambir Singh | फरार मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह भारतातच, ‘या’ ठिकाणी आहेत मुंबईचे माजी पोलिस आयुक्त

by nagesh
Parambir Singh | former mumbai cp parambir singh in chandigarh

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांना फरार घोषीत करण्यात आले आहे. पाच वेगवेगळ्या खंडणीच्या प्रकरणात (ransom case) आरोपी असलेले परमबीर सिंह (Parambir Singh) मागील काही दिवसांपासून बेपत्ता आहेत. परमबीर सिंह यांचा ठावठिकाणा लागत नसल्याने मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने (Mumbai Police Crime Branch) त्यांना फरार (Absconding) घोषीत करा अशी मागणी करणारा अर्ज न्यायालयात दाखल केला. त्यानंतर मुख्य दंडाधिकारी न्यायालयाने (Chief Magistrate Court) त्यांना फरार घोषित केले आहे. मात्र, आता परमबीर सिंह यांनी एका वृत्तवाहिनला फोन करुन आपण कोठे आहोत याची माहिती दिली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

खंडणी प्रकरणात आरोपी असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांनी वृत्तवाहिनीला फोन करुन आपण भारतातच असून सध्या चंदीगडमध्ये (Chandigarh) असल्याची माहिती दिली आहे. परमबीर सिंह यांना 17 नोव्हेंबर रोजी फरार घोषीत करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना 30 दिवसांची मुदत देण्यात आली होती. 30 दिवसांत जर ते न्यायालयात हजर झाले नाही तर त्यांची मालमत्ता सील (Property seal) करण्याचा अधिकार राज्य सरकारला (State Government) मिळणार होते. मात्र, त्यापूर्वीच परमबीर सिंह यांनी चंदीगड येथे असल्याची माहिती वृत्तवाहिनीला दिली असून लवकरच न्यायालयाच्या आदेशानुसार हजर होणार आहे.

परमबीर सिंह यांच्याविरोधात सध्या 5 खंडणीचे वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापैकी गोरेगांव (Goregaon) येथील खंडणी प्रकरणाचा तपास करणाऱ्या गुन्हे अन्वेषण विभागानं परमबीर यांना चौकशीसाठी समन्स बजावलं होतं. मात्र ते हजर राहिले नसल्याने त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंटही (Non-bailable warrant) जारी करण्यात आले.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

खंडणीच्या गुन्ह्यात आतापर्यंत केलेल्या तपासानुसार आरोपी असलेले सिंह हे कुठेही सापडत
नसल्याने मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्यावतीने विशेष सरकारी वकील अ‍ॅड. शेखऱ जगताप (Special Public Prosecutor Adv. Shekhar Jagtap)
यांनी मुख्य महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयात परमबीर सिंह यांच्यासह रियाझ भाटी (Riaz Bhati)
आणि विनय सिंग उर्फ बबलू (Vinay Singh alias Bablu) यांना फरार घोषित करण्यात यावे असा विनंती करणारा अर्ज सादर केला होता.
यावर मुख्य अतिरिक्त दंडाधिकारी भाजीपाले यांच्यासमोर सुनावणी झाली.
त्यावेळी अ‍ॅड. शेखर जगताप यांनी या आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 384,385,388,389,120ब, 34 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
तसेच न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केल्याची माहिती दिली.

Web Title :- Parambir Singh | former mumbai cp parambir singh in chandigarh

हे देखील वाचा :

Maharashtra Cabinet Reshuffle | अधिवेशनापुर्वी मंत्रिमंडळात फेरबदल?; काँग्रेसचे दोन मंत्री बदलणार तर, ‘या’ चेहर्‍यांना संधी

Pune Crime | चोरट्यांचा भरदिवसा महिलेच्या दागिन्यांवर डल्ला, पुण्यातील घटना

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 64 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Related Posts